Homeताज्या बातम्याराजकारण

एसआयआरचा तिसरा टप्पा जाहीरमहाराष्ट्रासह 19 राज्यांत होणार मतदार पडताळणी37 कोटी मतदारांवर पडणार प्रभाव ; बूथस्तरीय अधिकार करणा तपासणी

नवी दिल्ली/मुंबई : देशातील मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्

केमिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीवर संशयाची छायाहितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप; नातेवाईकांना उमेदवारी, अधिकार्‍यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह
पश्चिम बंगालची नवी विधानसभा : श्रीमंती आणि गुन्हेगारीची ही !
एसआयआर : पुनरावलोकन की लोकशाहीवरील सावट ?


नवी दिल्ली/मुंबई : देशातील मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्याची घोषणा केली आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला असून, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता देशातील बहुतांश भागात ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
यापूर्वीच्या दोन टप्प्यांमध्ये 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे 59 कोटी मतदारांची पडताळणी करण्यात आली होती. आता सुरू होणार्‍या तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, हरियाणा, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांसह दिल्ली, चंदीगड, दादरा-नगर हवेली, दमण-दीव या भागांतील मतदार याद्यांचे पुनरावलोकन केले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या मोहिमेत 3 लाख 94 हजारांहून अधिक बूथस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत. सुमारे 36 कोटी 73 लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामासाठी 3 लाख 42 हजार बूथस्तरीय प्रतिनिधींचीही मदत घेतली जाणार आहे. राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतिनिधी नियुक्त करून प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन आयोगाने केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. ओडिशा, मिझोराम, सिक्कीम आणि मणिपूरमध्ये मसुदा यादी 5 जुलैला प्रसिद्ध होईल, तर अंतिम यादी 6 सप्टेंबरला जाहीर केली जाईल. दादरा-नगर हवेली आणि दमण-दीवसाठी मसुदा यादी 10 जुलैला, अंतिम यादी 11 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. उत्तराखंडसाठी मसुदा यादी 14 जुलैला आणि अंतिम यादी 15 सप्टेंबरला जाहीर केली जाईल. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा आणि चंदीगडसाठी मसुदा यादी 21 जुलैला, तर अंतिम यादी 22 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. तेलंगणा आणि पंजाबसाठी मसुदा यादी 31 जुलैला आणि अंतिम यादी 1 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, मेघालय आणि दिल्लीसाठी मसुदा यादी 5 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाईल, तर अंतिम यादी ऑक्टोबरमध्ये जाहीर होईल. नागालँडसाठी अंतिम यादी 22 नोव्हेंबरला, तर त्रिपुरासाठी 23 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
महाराष्ट्रात 9.86 कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा
‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (एसआयआर) या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात राज्यातील एकूण 9,86,44,413 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत (बीएलओ) नियुक्त करण्यात येणार आहे. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले ‘बूथ लेव्हल एजंट्स’ (बीएलए) त्यांना सहकार्य करणार आहेत.

COMMENTS