Homeताज्या बातम्याबीड

चकलांबा येथे ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचा भव्य प्रारंभ

 गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे राष्ट्रीय कीर्तनकार तथा सुप्रसिद्ध शिवपुराण कथाकार, वाणीभूषण ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतू

गँगवॉरच्या छायेत नांदेड पोलिसांचा श्वास गुदमरतोय!1 हजार 500 नागरिकांमागे एकच पोलिस, कायदा-सुव्यवस्था धोक्यात
हॉटेल व्यवसायासाठी ११ लाखांची मागणीविवाहितेचा छळ, पतीसह सहा जणांवर गुन्हा
पोखरीघाट ग्रामस्थांचा आदर्श पायंडा!हरिनाम सप्ताहात कुस्ती खेळाला प्रोत्साहन-राजेंद्र मस्के



 गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे राष्ट्रीय कीर्तनकार तथा सुप्रसिद्ध शिवपुराण कथाकार, वाणीभूषण ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून होणार्‍या श्री शिवमहापुराण कथेचा प्रारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.
ही भव्य शिवमहापुराण कथा दि. 11 ते 17 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, शुक्रवारी विविध मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंडप व व्यासपीठ उभारणीचा शुभारंभ विधिवत पार पडला. या धार्मिक सोहळ्यासाठी सुमारे 25 हजार भाविकांच्या बसण्याची भव्य व्यवस्था करण्यात आली असून, 21 हजार रुद्राक्षांचे वाटप हे या कथेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. कथा दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक, चकलांबा येथे होणार आहे. या पवित्र शिवमहापुराण कथेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक गुंजाळ यांनी केले आहे.

COMMENTS