Homeताज्या बातम्याअहमदनगर

गुणवंत विद्यार्थी पूर्वा जाजूचा सत्कार

अकोले : एच.एस.सी. वाणिज्य शाखेत अकोले तालुक्यात सर्वप्रथम व मॉडर्न कॉलेज मध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या  पूर्वा जाजू चा मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज-अकोले चे शिक्षक तसेच अकोले तालुका माहेश्‍वरी सभेच्या पदाधिकार्‍यांनी निवासस्थानी येवुन सत्कार केला.येथील मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी पूर्वा ज्योती धनंजय जाजू हिने एच.एस.सी. (वाणिज्य) परिक्षेत 87.83 टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला. पूर्वा मॉडर्न कॉलेजच्या कला, वाणिज्य व विज्ञान विभागात प्रथम आली असून वाणिज्य शाखेत अकोले तालुक्यात सर्वप्रथम आली. या निमीत्ताने तिला सन्मानित करण्यात आले. पूर्वा ने यापूर्वी देखील एस.एस.सी. परिक्षेत हायस्कुल मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला होता. तर संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त करून अकोले तालुक्यात प्रथम आली होती. सत्काराला उत्तर देतांना मला सी.ए. करण्याचा मनोदय असल्याचे पूर्वा ने सांगितले. उपप्राचार्य प्रा.दीपक जोंधळे, उप मुख्याध्यापक सुधीर जोशी यांनी पूर्वा ला पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरविला. त्याचबरोबर ज्योती, धनंजय व अजय जाजू यांचाही यावेळी सत्कार केला. याप्रसंगी प्रा.संपतराव वाळके, प्रा.सुरेखा भोसले, प्रा.प्रमिला फरगडे, ऋषभ शहा, पराग सोमणी, विजय क्षिरसागर, तर अकोले तालुका माहेश्‍वरी सभेच्या वतीने तालुकाध्यक्ष निरज मुंदडा, सचिव प्रसाद राठी, यांनी पूर्वाचा सत्कार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष चेतन बुब, खजिनदार गौतम मुंदडा, संगठन मंत्री सर्वेश डांगरा, सह-सचिव अल्पेश सारडा, माजी सचिव विशाल राठी आदी मान्यवर उपस्थित होते.  

राजूरच्या तरूणाची ‘एटीएस’कडून चौकशीपाकिस्तानी गँगस्टरशी सोशल मीडियावर संपर्कात असल्याचा संशय
कौशल्याधारित शिक्षणामुळे उज्ज्वल भविष्य : आ. लहामटे  
कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे

COMMENTS