आत्मा मालिक मध्ये साईच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आत्मा मालिक मध्ये साईच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती

कोपरगाव प्रतिनिधी  दिनांक ११ ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलाचे आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण ता. कोपरगाव

जिल्हा नामांतराचा निर्णय घेतला तर, त्याचे पडसाद उमटतील…
प्रवासी भाडे सवलतीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर – औरंगाबाद रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; देवगड, नेवासा व शनिशिंगणापूरला होणार अधिक लाभ

कोपरगाव प्रतिनिधी 

दिनांक ११ ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलाचे आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथे भारतीय खेळ प्राधीकरण (साई) यांच्या मार्फत १२ ते १६ वयोगटाखालील मुलांची कुस्ती या खेळासाठी खेळाडुंची निवड प्रक्रीया भरती केली जाणार आहे.

तरी इच्छुक खेळांडुनी या भरती प्रक्रीयेत सहभागी व्हावे असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण चे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमार सुर्यवंशी साहेब व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक भरत नायकल सर यांचे वतीने करण्यात आले आहे.

या भरती व निवड प्रक्रीयेतील पाञता व निकष पुढील प्रमाणे आहेत. खेळाडूचे वय १२ ते १६ वर्षे झालेल्या खेळाडुंना अधिक प्राधान्य दिले जाईल. या भरती व निवड प्रक्रीयेसाठी खेळाडूने सोबत आधार कार्ड, बोनाफाईड, जन्मदाखला, खेळाचे प्रमाणपञ, मुळप्रत व झेरॉक्सस तसेच पासपोर्ट साईज ०४ फोटो कलर सोबत आणावे.हि निवड प्रक्रीया आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण, ता. कोपरगाव, रोड येथे होणार आहे. सर्व खेळाडूंनी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत नावनोंदणी करावयाची आहे. उशीरा झालेल्या खेळाडूंचा विचार केला जाणार नाही.

नावनोंदणीसाठी विवेक नायकल ९५१८६५३४९५ अक्षय डांगे ८७६६७२९९९५ यांचेशी संपर्क साधावा.

COMMENTS