Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : देशातील वाढती इंधनटंचाई, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि खर्च नियंत्रणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने काटकसरीची भूमिका स्वीकारण्याचे संकेत

नितीश कुमार यांचा राज्यसभेकडे प्रवास : सन्मानीय गच्छंती?
घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते तातडीने द्या; खा.बजरंग सोनवणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रबीड जिल्ह्यात 54 हजार घरकुलांचे हप्ते रखडले
उर्दुघर ला मिळाली तातडीने निधीसह मंजुरीआ.संदिप क्षीरसागरांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार


मुंबई : देशातील वाढती इंधनटंचाई, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि खर्च नियंत्रणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने काटकसरीची भूमिका स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी केली. तसेच, मंत्र्यांचे परदेश दौरेही अत्यावश्यक कारणांशिवाय थांबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि खर्च नियंत्रणाबाबत केलेल्या आवाहनानंतर राज्य सरकारने ही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारी कामांच्या नावाखाली होणारे अनावश्यक परदेश दौरे टाळून परकीय चलनाची बचत करणे आणि प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवणे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, बसने प्रवास करण्याची तयारी दर्शवली आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी मेट्रोसेवेचा वापर करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जनतेसमोर साधेपणाचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. विरोधकांकडून पंतप्रधानांच्या आवाहनावर टीका होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावरही भाष्य केले. जागतिक परिस्थिती गंभीर असताना देशहिताच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS