Homeताज्या बातम्याअहमदनगर

मिरजगाव परिसरात मृतदेह आढळला

कर्जत : मिरजगाव परिसरातील अशोक रामभाऊ खिल्लारे यांच्या विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गंगाराम राज नाथ (वय २६, म

अल्पवयीन मुलास मारहाण  
गावठी कट्टे विकणारा कर्जत पोलिसांच्या जाळ्यात दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त ; ६२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली;प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ
Woman's body with strangulation mark found at base of fort in Maharashtra's Thane

कर्जत : मिरजगाव परिसरातील अशोक रामभाऊ खिल्लारे यांच्या विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गंगाराम राज नाथ (वय २६, मूळ रा. नेपाळ, हल्ली मुक्काम मिरजगाव) असे मृत युवकाचे नाव असून तो पूर्वी हॉटेल शिवम येथे आचारी कर्मचारी म्हणून काम करत होता.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीचे मालक अशोक रामभाऊ खिल्लारे हे आपल्या विहिरीजवळ गेले असता त्यांना पाण्यात अर्धवट तरंगत असलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ शेजारील हॉटेलमधील नागरिकांना बोलावून घटनेची माहिती दिली. त्यानंतर जवळच असलेल्या हॉटेल शिवमचे मालक अभंग रूपचंद बोरुडे (रा. कोकणगाव, ता. कर्जत) हेही घटनास्थळी दाखल झाले.अभंग बोरुडे यांनी मृत युवकाची ओळख गंगाराम राज नाथ अशी पटवून दिली. गंगाराम हा त्यांच्या हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता; मात्र तो सुमारे तीन महिन्यांपूर्वी काम सोडून निघून गेला होता, अशी माहिती त्यांनी दिली.सदर घटनेची खबर सकाळी सुमारे १२.३० वाजण्याच्या दरम्यान पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS