राज्य गारठले ; पिकांचे मोठे नुकसान ; उत्तर, मध्य पश्‍चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य गारठले ; पिकांचे मोठे नुकसान ; उत्तर, मध्य पश्‍चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल

मुंबई/पुणे : राज्यात कालपासून ढगाळ वातावरण असून, रात्री अनेक जिल्ह्यात पावसाने अचानक हजरी लावल्याने संपूर्ण महाराष्ट्र गारठला असून, विविध जिल्ह्यात प

शेतकऱ्यांना अर्थसहाय्यापेक्षा आधाराची गरज
संगमनेरमध्ये कत्तल खान्यावर छापा
‘अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा’ I LOKNews24

मुंबई/पुणे : राज्यात कालपासून ढगाळ वातावरण असून, रात्री अनेक जिल्ह्यात पावसाने अचानक हजरी लावल्याने संपूर्ण महाराष्ट्र गारठला असून, विविध जिल्ह्यात पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने 17 जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच राज्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे, रब्बी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. गाळ हवामान आणि प्रचंड पाऊस असल्यामुळे उत्तर, मध्य आणि पश्‍चिम महाराष्ट्रात शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून द्राक्ष व टोमॅटो भाजीपाला अक्षरशः संपूर्ण शेतात संपून गेला आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून काढणीला आलेली पिके शेतात जमीनदोस्त झाल्याने शेतकर्‍यांपुढे उत्पन्नाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विशेषत: द्राक्ष आणि टोमॅटो या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कमी म्हणून की काय आज आणि उद्या असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यात तसेच पश्‍चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.गेल्या तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतमालावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
अरबी समुद्रामध्ये असलेली चक्रीय वातप्रणाली आणि कच्छपर्यंत निर्माण झालेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे मराठवाड्याचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये बुधवारी पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. औरंगाबादसह पुणे, मुंबई, नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. उत्तरेकडील हवामान बदलामुळे तापमानात कमालीचा चढउतार होत आहे. त्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतमालावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. पालघर, धुळे, नंदूरबार, नाशिक येथे ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला होता. तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता होती. यासोबतच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या वेळेत झालेल्या नोंदीनुसार माथेरामध्ये 20 मिलीमीटर, नाशिकमध्ये 19 मिलीमीटर, अलिबागमध्ये 21 मिलीमीटर, डहाणूमध्ये 11.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुण्यातही दिवसभर पावसाचा जोर होता. थांबूनथांबून सरी कोसळत होत्या. रात्री 8.30 वाजेपर्यंत 33.8 मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली.
गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्‍वर शहर व परिसरात कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐन हिवाळ्यात महाबळेश्‍वरकरांसह पर्यटक जून महिन्यासारखा पावसाचा ‘फील’ अनुभवत आहेत. मात्र, दोन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसाचा फटका स्ट्रॉबेरी पिकाला बसला असून, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाबळेश्‍वरसह परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून कडाक्याची थंडी, दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

’जेवाद’ चक्रीवादळाचे सावट ; आज पावसाचा जोर वाढणार
हवामानातील या अचानक बदलामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांत पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या वादळी चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने ’जेवाद’ चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्‍चिम आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार करण्यात आला आहे. यामुळे हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे 3 डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. 3 डिसेंबर रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS