केज येथे पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा उत्साहात सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी गटाचे प्रशिक्षण पूर्ण झाले

केज येथे पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा उत्साहात सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी गटाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्या सहभागी निमंत्रक शेतकर्यांसाठी केले ते शेतकरी गट बांधणी कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे, पर्यावरण मित्र डॉ. हनुमंत सौदागर, कृषी विभाग शरद घोबाळे,उमेदच्या तालुका अभियान व्यस्थापक नंदाताई ओव्हाळ,प्रभाग समन्वयक राजरत्न कसबे, आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील शेतकरी घटना प्रेरित करून उत्पादन वाढीसाठी एकत्र येऊन गट बांधणी करणे आवश्यक आहे. कृषी विभाग कायम सोबत असल्याचे मत कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी व्यक्त केले. फार्मर कपच्या माध्यमातून शेतकर्यांची समृद्धी होईल. शेतकर्यांच्या उन्नतीचा हा उत्तम मार्ग असल्याचे डॉ.हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले. शेतकरी गटांना सदस्य निवड अथवा अन्य अडचणी आल्यास त्यांनी पाणी फाउंडेशन ,कृषी विभाग, उमेद यांच्याशी समन्वय साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. गट बांधणी झालेल्या तालुक्यातील विविध शेतकरी गटांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तालुक्यात महिला शेतकरी गट मोठ्या संख्येने सक्रिय झाल्याचे कार्यशाळेत दिसून आले. यावर्षीचा फार्मर कप तालुक्यात यावा यासाठी सर्वांच्या वतीने प्रयत्न करावेत असे मत त्यावेळी व्यक्त केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी तांत्रिक प्रशिक्षक विनोद ठोंबरे, तालुका समन्वयक सुवर्णा कांबळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यशाळेस तालुक्यातील निमंत्रक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS