परदेशातून आलेल्या दहाजणांचा शोध सुरू…पाचजण सापडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परदेशातून आलेल्या दहाजणांचा शोध सुरू…पाचजण सापडले

नगरमधील दोघे निगेटिव्ह, ओमिक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क

अहमदनगर/प्रतिनिधी : नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर परदेशातून नगर जिल्ह्यात आलेल्या 15 जणांपैकी 10 जणांचा अजून शोध लागलेला नाही. दरम्यान, स

राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मार्गी ; ३९९.३३ कोटींचा निधी मंजूर : आ. रोहित पवार
अवैध सावकारी करणार्‍यांच्या घरावर छापे
डॉ. शिवाजी काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार


अहमदनगर/प्रतिनिधी : नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर परदेशातून नगर जिल्ह्यात आलेल्या 15 जणांपैकी 10 जणांचा अजून शोध लागलेला नाही. दरम्यान, सापडलेल्या नगरमधील दोघांचा व राहुरीतील तिघांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे, पण त्यांचा आरटीपीसीआर अहवाल प्रलंबित आहे. या पाचहीजणांना गृहविलगीकरणात ठेवले गेले आहे.
‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर परदेशातून नगर जिल्हयात आलेल्या 15 प्रवाशांची माहिती दिल्ली आणि मुंबई येथील विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आली होती. ही माहिती मिळताच प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यापैकी 5जणांचा शोध लागला. नगर शहरात आलेल्या दोघांची मनपाकडून आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. अमेरिकेहून आलेल्या या दोघांची दिल्ली व मुंबई येथे चाचणी करण्यात आली होती. ‘त्या’ दोन प्रवाशांचा करोना अहवाल निगेटिव्ह असून मनपा आरोग्य विभागाने या दोघांशी संपर्क साधून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. आरटीपीसीआर अहवाल अजून प्रलंबित आहे. त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर निरीक्षण ठेवून आहे, अशी माहिती मनपा आरोग्य विभागाने दिली. नगरमध्ये आल्यानंतर त्यांनी अँटीजेन चाचणी केली. त्याचाही अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. आरोग्य विभागाकडून त्यांची आठव्या आणि चौदाव्या दिवशी पुन्हा चाचणी केली जाणार आहे. नगर शहरात सावेडी व रेल्वेस्टेशन परिसरात ते राहात असल्याचे समजले. दरम्यान, परदेशातून राहुरीत आलेल्या तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांनाही गृहविलगीकरणात ठेवले गेले आहे. तसेच परदेशातून जिल्ह्यात आलेल्या इतर दहाजणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना शोधून त्यांचीही कोरोना तसेच अन्य चाचण्या तातडीने केल्या जाणार आहेत.

COMMENTS