Homeताज्या बातम्याअहमदनगर

भीषण अपघातात जामखेडच्या दोन तरुणांचा मृत्यूमाहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील दुर्घटना; एक गंभीर

जामखेड : माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर

खर्डा इंग्लिश स्कुलला ठोकले कूलुप
चिमुरड्यासह विवाहितेचा विहिरीत मृतदेहजामखेडमधील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा

जामखेड : माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे जामखेड शहरासह परिसरात शोककळा पसरली असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ भगवान जायभाय यांचे चिरंजीव ऍड. विराज भगवान जायभाय (वय २५) हे पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. मोठ्या भावाच्या लग्नानिमित्त ते जामखेड येथे आले होते. लग्नकार्य आटोपल्यानंतर रविवारी (दि. ११) रात्री ऍड. विराज जायभाय, सोनू डुचे (वय २४) आणि त्यांचा पुणे येथील एक मित्र हे तिघेजण पुण्याकडे निघाले होते.ते आय-२० या चारचाकी (एमएच १७ एझेड ३२४२) वाहनातून प्रवास करत असताना माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील आंबिलवाडी गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकला. भरधाव वेगातील कार रस्ता सोडून थेट शेतात घुसली आणि अनेक पलट्या मारत उलटली. अपघात इतका भीषण होता की ऍड. विराज जायभाय आणि सोनु डुचे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला पुणे येथील मित्र गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचा मोठा आवाज ऐकून जवळील घरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना गाडीतून बाहेर काढले आणि जामखेड येथील नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.  या दुर्दैवी घटनेमुळे जामखेड शहरातील मित्रपरिवार, नातेवाईक आणि विधिज्ञ क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.दरम्यान, ऍड. विराज जायभाय यांच्या निधनाबद्दल जामखेड तालुका वकील संघाने शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दुःखात सहभागी होत एक दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वकील संघाचे ऍड. अमीर खान यांनी दिली.ऍड. विराज जायभाय यांनी अल्पावधीतच पुणे न्यायालय परिसरात अभ्यासू, शांत व उमदा युवा वकील म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकाली निधनाने वकील संघटनांसह मित्रपरिवारातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सोनु डुचे हे देखील मनमिळावू स्वभावामुळे परिसरात परिचित होते.लग्न घरातील आनंद शोकसागरात परिवर्तित जायभाय कुटुंबात मोठ्या भावाच्या लग्नामुळे आनंदाचे वातावरण होते. नातेवाईक, मित्रपरिवार आणि पाहुण्यांची वर्दळ सुरू असतानाच पुण्याकडे निघालेल्या विराज जायभाय यांच्यावर काळाने झडप घातली. काही तासांपूर्वी आनंदात वावरणार्‍या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS