Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राचार्यांना खंडणी मागणारे तिघे पोलिस अधिकारी बडतर्फ

पुणे : एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा पोलिस कर्म

कांगोणी फाटा परिसरात ट्रॅक्टर-बसची भीषण धडक; एकाचा मृत्यू
महाराष्ट्रातही ‘जॉम्बी ड्रग’ची एन्ट्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ!
कौटुंबिक कलहातून पतीचा काटा काढला; आठ महिन्यांपूर्वीचा खून गेवराई पोलिसांकडून उघड
Pune News: 55-Year-Old Principal's Life Made Unbearable Outrageous Act by  Pune Police

पुणे : एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा पोलिस कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित बडे, पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघेही फरार असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात प्राचार्यांना बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत सुमारे सात लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. खंडणी उकळण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, या कृत्याला अत्यंत गंभीर मानण्यात आले आहे. अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी बडतर्फीचे आदेश जारी केले. यापूर्वी संबंधित तिघांना निलंबित करण्यात आले होते. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत तिघेही दोषी असल्याचे निष्पन्न झाले. फरार अवस्थेत असल्यामुळे ते विभागीय चौकशीस उपस्थित राहिले नाहीत. तसेच, ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे नमूद करत, जनतेचा विश्‍वास अबाधित राहावा यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विभागीय चौकशीची प्रक्रिया बाजूला ठेवून, घटनात्मक तरतुदीनुसार तिघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

COMMENTS