नागपूर : ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन झाले. ते ’तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याचे गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. रविवारी रात्री एका खा

नागपूर : ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन झाले. ते ’तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याचे गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत आणि साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. जहीर आलम यांनी 90 च्या दशकात ’तुम तो ठहरे परदेसी’ हे अजरामर गीत लिहिले. अल्ताफ राजा यांनी गायलेल्या या गाण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या गाण्याने सर्वाधिक विक्री होणार्या कॅसेट्सचा जागतिक विक्रम (गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड) प्रस्थापित केला होता.

COMMENTS