लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ,केज संचलित सिद्धिविनायक विद्यालय, कुंभमेळ ता.केज या विद्यालयाचा एस.एस.सी. मार्च 2026 चा निकाल 94.23 टक्के लागला आहे

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ,केज संचलित सिद्धिविनायक विद्यालय, कुंभमेळ ता.केज या विद्यालयाचा एस.एस.सी. मार्च 2026 चा निकाल 94.23 टक्के लागला आहे एकूण 52 विद्यार्थ्यांपैकी 49 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. सिद्धिविनायक विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विशेष प्राविण्य सह 26 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 15 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 7 विद्यार्थी आणि तृतीय श्रेणीमध्ये 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्वप्रथम कु. पुनम लिंबराज शिंदे 91.00 टक्के, द्वितीय कु. श्रावणी महादेव शिंदे 90.40 टक्के, तृतीय कु.समीक्षा विलास थोरात88.60 टक्के, कु.रूपाली दत्तात्रेय थोरात88.00 टक्के, चि. शुभम संजय सिरसट 88.00 टक्के, कु. सुजाता हनुमंत चटक 86.80 टक्के या विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहेत. सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी.एम.बोबडे, उपाध्यक्ष एम.के.कदम, सचिव डॉ.आय.एन.महाकुंडे, शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.सपाटे, माजी मुख्याध्यापक बि.डी. डिसले,जे.बी. थोरात यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी आणि पंचक्रोशीतील नागरिक यांनी पालक व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS