Homeताज्या बातम्याबीड

शहरातील कॅफे बंद कराआ.सोळंके यांची पोलीस निरीक्षकाकडे मागणी

शहरातील सर्व कॅफे बंद करा अशी मागणी आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी येथील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या कडे एका पत्राद्व

बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या ‘स्थलांतर पूर्व नियोजन’ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयकामगारांसाठी स्वतंत्र ओळखपत्रे, आरोग्य शिबिरे, जन्मदाखले व योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर
मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतशासनाचा निर्णय जारी, मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्याला यश
गुलाब देत पोलीस म्हणाले, जीव तुमचा आहे अन् नियमही तुमच्यासाठीचबीड पोलीसांनी फुलातून फुलवला वाहतुक शिस्तीचा संदेश



शहरातील सर्व कॅफे बंद करा अशी मागणी आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी येथील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे.
येथील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंदे सुरू असली तर याकडे पोलिसांचे लक्ष नसून येथील आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या विरोधात विधानसभेमध्ये आवाज उठवला असला तरी त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. सध्या माजलगाव शहरात सुरू असलेले कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुली वर अत्याचार झाल्याची घटना घडली असून त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांनी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शहर  यांना एका पत्राद्वारे शहरातील सर्व कॅफे बंद करा असे सूचित केले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की  शहरात खालील नावाचे कॅफे कार्यरत आहेत. मला मिळालेल्या माहितीनुसार या कॅफे चालवण्यासाठी अन्न व औषधी विभागाचा परवाना नाही व शॉप अ‍ॅट चा ही परवाना नाही. या कॅफे मध्ये अल्पवयीन मुले व मुली एकत्र येवुन अनेक गैरप्रकार घडत आहेत व काही मुलींवर जबरदस्तीने लैंगीक अत्याचार होत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. म्हणून खालील चालू असलेले कॅफे बंद करावेत
1. उ.इ.उ. उरषश
2. इशज्ञशअ‍ॅी र्ङेीहसी लरषश
3. ओळी लरषश
4. थ.ड. उरषश
5. घरीींंर उरषश
6. डेरश्रश्रर उरषश
 स्वतः आमदार यांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्र देऊन कॅफे बंद करण्याची मागणी करणे ही गंभीर बाबा असून पोलीस निरीक्षकांनी यावर तात्पर कारवाई करणे गरजेचे असले तरी अशी कारवाई होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वास्तविक येथे कॅफेमध्ये गैरप्रकार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तरी असे गैरप्रकार करणारे कॅफे बंद होणे आवश्यक होते परंतु येथील प्रशासनाने या घटनेकडे म्हणावे तेवढे गंभीर केले पाहिजे नाही म्हणून आमदार प्रकाश सोळंके यांना पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी करावी लागली याकडे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. आ. प्रकाश सोळंके यांनी 9/5/2026 रोजी पत्र दिले म्हणजे आजपर्यंत वरील सर्व कॅफे चालू असल्याचे दिसून येते.

COMMENTS