Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औषध विक्रेत्यांची २० मे रोजी देशव्यापी बंदची हाक; संकेतस्थळावरील औषध विक्रीविरोधात आंदोलन

श्रीगोंदा : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बेकायदेशीर संकेतस्थळावरील (Online) औषध विक्री तसेच मोठ्या व्यावसायिक कंपन्यांकडून होत असलेल

इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेल महागल्याने वाहनधारक आणि नागरिक हैराण
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी;खा. शरद पवारांची भूमिका ; धर्मांध प्रवाहाबाबत केली चिंता व्यक्त

श्रीगोंदा : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बेकायदेशीर संकेतस्थळावरील (Online) औषध विक्री तसेच मोठ्या व्यावसायिक कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक औषध विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे.

संघटनेच्या माहितीनुसार, औषध व्यवसाय हा १९४० च्या औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा तसेच १९४५ च्या नियमानुसार चालविला जातो. मात्र संकेतस्थळावरील औषध विक्रीसंदर्भात कायद्यात स्पष्ट तरतूद नसतानाही देशभरात मोठ्या प्रमाणावर औषध विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१८ रोजी संकेतस्थळावरील औषध विक्रीसंदर्भात अधिसूचना जारी केली होती, मात्र अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर झालेले नाही. याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयाने ऑनलाइन औषध विक्रीला स्थगिती दिल्याचे संघटनेने म्हटले आहे. तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कोरोना काळात सरकारने २६ मार्च २०२० रोजी औषधांची घरपोच सेवा करण्यास विशेष सवलत दिली होती. मात्र कोरोना संकट संपून पाच वर्षे उलटल्यानंतरही ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. याचाच फायदा घेत काही कंपन्या मोठ्या प्रमाणावर सवलती देऊन औषध विक्री करत आहेत. देशातील सुमारे १२ लाख ५० हजार औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या पर्यायी कंपन्यांची औषधे देण्याचा अधिकार विक्रेत्यांना मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी महाराष्ट्रातील बंद १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

COMMENTS