झुंज दुर्घटनेतील ११ कुटुंबातील व्यक्तींना २२ लक्ष रुपयांची आर्थिक मदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झुंज दुर्घटनेतील ११ कुटुंबातील व्यक्तींना २२ लक्ष रुपयांची आर्थिक मदत

वरुड तालुका प्रतिनिधी :  श्री क्षेत्र झुंज ता.वरुड येथील वर्धा नदित नाव उलटल्यामुळे पाण्यात बुडून मृत पावलेल्या कुटूंबातील व्यक्तींचे नातेवाईकांना

नक्षल्यांना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन… मुख्यमंत्र्यांनी मागितला १२०० कोटींचा निधी
चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा
LIVE मुख्यमंत्री.. बारामती इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन

वरुड तालुका प्रतिनिधी : 

श्री क्षेत्र झुंज ता.वरुड येथील वर्धा नदित नाव उलटल्यामुळे पाण्यात बुडून मृत पावलेल्या कुटूंबातील व्यक्तींचे नातेवाईकांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मदत पुनर्वसन राज्यमंत्री प्रजक्त तनपुरे, प्रधान सचिव आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन असीम गुप्ता, यांच्याकडे केली होती.

श्री क्षेत्र झुंज ता.वरुड येथे वर्धा नदिला प्रचंड पूर असल्यामुळे नाव पाण्यात उलटून त्यामध्ये ११ व्यक्ती पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे या दुर्घटनेमध्ये मृत पावलेले नारायण सोनाजी मटरे,  वंशीका प्रदीप शिवणकर,  किरण विजय खंडाळे, आदिती सुखदेव खंडाळे, मोहिनी सुखदेव खंडाळे, पियुष तुळशिदास मटरे, पुनम प्रदिप शिवनकर,  आश्वीनी अरुन खंडाळे, वृषाली अतुल वाघमारे,  अतुल गणेशराव वाघमारे, कु.निशा नारायण मटरे, यांचा मृत्यू झाल्यामुळे सदर कुटूंबासमोर दुखाचा डोंगर कोसळला. 

त्यांचे कुटूंबाना दुखातुन सावरण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री सहायता निधी मधून ११ व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लक्ष रुपये प्रमाणे एकून २२ लक्ष रुपये मदत तात्काळ मंजुर करून दिल्यामुळे  मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचे आभार मानले. 

COMMENTS