Homeताज्या बातम्याअहमदनगर

दहावी परीक्षेत जगदंबा विद्यालयाचे यश 

अहिल्यानगर : भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित जगदंबा विद्यालय, केडगाव येथील विद्यार्थ्यांनी यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. विद्यालयाचा निकाल 96 टक्के लागला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करत उज्ज्वल यश मिळविले. विशेष प्राविण्य मिळवळलेले 7 विद्यार्थी तर प्रथम श्रेणी 10 द्वितीय श्रेणी 6 आणि उत्तीर्ण श्रेणी 1 या पद्धतीने  गुण संपादित केले. यामध्ये प्रथम डोंगरे सुरज राजेंद्र 90 टक्के, द्वितीय शेंडे साक्षी बळीराम 89.40 टक्के आणि तृतीय बटुळे भारती दत्तात्रय हिने 87 टक्के गुण मिळवले.  या यशामुळे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक दरेकर जे.एस., सर्व अनुभवी शिक्षकवृंद व पालक यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक तसेच पालक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भानुदास एकनाथ कोतकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल
के. रामलू’ पब्लिक स्कूलचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश5 वी व 8 वीतील 74 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
सरस्वती विद्यालय तेलगाव ची यशाची परंपरा कायम

अहिल्यानगर : भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित जगदंबा विद्यालय, केडगाव येथील विद्यार्थ्यांनी यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. विद्यालयाचा निकाल 96 टक्के लागला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करत उज्ज्वल यश मिळविले. विशेष प्राविण्य मिळवळलेले 7 विद्यार्थी तर प्रथम श्रेणी 10 द्वितीय श्रेणी 6 आणि उत्तीर्ण श्रेणी 1 या पद्धतीने  गुण संपादित केले. यामध्ये प्रथम डोंगरे सुरज राजेंद्र 90 टक्के, द्वितीय शेंडे साक्षी बळीराम 89.40 टक्के आणि तृतीय बटुळे भारती दत्तात्रय हिने 87 टक्के गुण मिळवले.

 या यशामुळे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक दरेकर जे.एस., सर्व अनुभवी शिक्षकवृंद व पालक यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक तसेच पालक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भानुदास एकनाथ कोतकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

COMMENTS