Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात वाढणार पावसाचा जोर

पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन प्रभावित झाले असून, पावसाचा जोर ओसरत नाही त

बीड जिल्हा परीषदचा अजब कारभार लकी ड्रो केला कॅन्सल !…
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांनी घेतली उडी l पहा LokNews24
छत्तीसगडमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन प्रभावित झाले असून, पावसाचा जोर ओसरत नाही तोच पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. परिणामी कोकण, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता बळीराजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील पंचगंगा, वशिष्ठी, पाताळगंगा, सावित्री, वर्धा आणि वैनगंगा नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठी राहणार्‍या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

यासोबतच ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. या राज्यांना पावसांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व राज्यांमध्ये 2 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढच्या 4 ते 5 दिवसांत पूर्व, ईशान्य आणि पूर्व मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 2 ऑगस्ट रोजी उत्तर पश्‍चिम भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्‍चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त 1 आणि 2 ऑगस्ट रोजी पश्‍चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडेल. तर उत्तराखंडमध्ये 2 ऑगस्टपर्यंत पाऊस पडेल. पूर्व उत्तर प्रदेशात 15 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे. मध्य भारतात, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 31 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 1 आणि 2 ऑगस्टला पश्‍चिम मध्य प्रदेश आणि 2 ऑगस्टला विदर्भात मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अनेक जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत – राज्यातील कोकण आणि विदर्भात सातत्याने जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं बळीराजा चिंतेत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

COMMENTS