बीड : बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आह

बीड : बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण 30,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात काही व्यक्तींकडून चक्री नावाचा जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान काही जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकत आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, चक्री जुगारासाठी वापरले जाणारे उपकरणे व इतर साहित्याचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेतला असून, संबंधित आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस अंमलदार राहुल शिंदे (पो.ह. 1626), आनंद मस्के (पो.ह. 402), गोविंद राख (पो.ह. 837) आणि नितीन वडमारे (चापो.ह. 779) यांनी सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

COMMENTS