Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संशोधनाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे; कुलगुरू डॉ. विलास खर्चे; नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन

 देवळाली प्रवरा : विद्यापीठातील संशोधनाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून त्यासाठी शास्त्रज्ञांनी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींचा

निलंग्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा बळी! ४२ अंशांच्या तडाख्याने शेतातच दुर्दैवी अंत
किनवटमध्ये ज्वारी-मका नोंदणीचा श्रीगणेशा; सर्वर डाऊन असल्याने ऑनलाईन प्रक्रियेत खोळंबा
अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव

 देवळाली प्रवरा : विद्यापीठातील संशोधनाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून त्यासाठी शास्त्रज्ञांनी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींचा अवलंब करावा, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

धुळे येथील शासकीय कृषी महाविद्यालयाला भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. एम. इल्हे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, डॉ. संदीप पाटील, डॉ. राहुल देसले, डॉ. विश्वनाथ शिंदे आणि डॉ. दिनेश नांद्रे आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. खर्चे यांनी सांगितले की, आगामी काळात शेतीसमोर विविध आव्हाने उभी राहणार असून संतुलित खतांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी विद्यापीठामार्फत “संतुलित खत वापर जागरूकता अभियान – २०२६” राबविण्यात येत आहे. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना त्यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान अनुकूल शेती, नैसर्गिक शेती आणि एकात्मिक शेती पद्धतींचा प्रसार करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. ग्रामीण युवकांना शेतीकडे वळवण्यासाठी कृषी उद्योजकता विकास, शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक मदत तसेच “फुले समृद्धी गाव” संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी “संतुलित खत वापर जागरूकता अभियान – २०२६” या भित्तीपत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरूंनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याचा आढावा घेत विविध विभागांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. तसेच बाजरी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्रालाही त्यांनी भेट दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बी. एम. इल्हे यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालयातील उपक्रमांचा आढावा मांडला, तर डॉ. राहुल देसले यांनी शैक्षणिक बाबींचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन डॉ. जगदिश काथपुरी यांनी केले असून आभार प्रदर्शन डॉ. विकास पवार यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS