Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण म्हणजे उन्नतीचा मार्ग, तर धम्माचे अनुसरण म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग-पूज्य भंते धम्मशील थेरोखेमाडे वस्ती (आहेर धानोरा) येथे भीमजयंती व बुद्ध जयंती उत्साहात साजरी

बीड : तालुक्यातील आहेर धानोरा येथील खेमाडे वस्तीवरील कपिलवस्तू बुद्ध विहार येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती तसेच तथागत गौतम

जैवविविधता जपणे हि खरी गरज-डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड; राजा राममोहन रॉय सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते-आनंद गायकवाड
पाणीपुरवठा योजना, विकासकामांचा खेळखंडोबा खपवून घेणार नाही; दिशा समितीच्या मॅरोथॉन बैठकीत खा.बजरंग सोनवणेंनी अधिकार्‍यांना धरले धारेवर; तब्बल 27 विभागाचा घेतला आढावा
जनगणना : देशाच्या विकासाचा आरसा आणि नियोजनाचा पाया-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन; बीडमध्ये जनगणना 2027 साठी प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणास आजपासून सुरुवात

बीड : तालुक्यातील आहेर धानोरा येथील खेमाडे वस्तीवरील कपिलवस्तू बुद्ध विहार येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती तसेच तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शिवणी येथील 40 श्रामणेर भिक्खू व अनागारिका संघाच्या उपस्थितीत भव्य धम्म रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भंते धम्मशील थेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून झाली. यावेळी सरपंच बालासाहेब आबा इंगोले प्रमुख उपस्थित होते. यानंतर उपस्थितांनी सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण केले. पूज्य भंते धम्मशील थेरो यांनी आपल्या प्रभावी धम्मदेशनेत शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, शिक्षण हा उन्नतीचा मार्ग असून तथागतांच्या धम्माचे अनुसरण करणे म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तसेच त्यांनी वैशाख पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, सिद्धार्थांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे तीनही महत्त्वाचे प्रसंग याच दिवशी घडले असून या दिवसाचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशाला खेमाडे यांनी केले, तर प्रस्ताविक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रमेश खेमाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली खेमाडे, सारिका खेमाडे, छाया खेमाडे, राहुल खेमाडे, सुधाकर खेमाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी आर. जे. इंगोले, सतीश घोलप, मनोज पवार, गणेश उगले, विनोद इंगोले, डॉ. अमरेंद्र विद्यागर, कॅप्टन राजाभाऊ आठवले, रवी वाघमारे, ड. राजेश शिंदे, ड. तेजस वडमारे, डी. जी. वानखेडे, प्रेम कांबळे, यशवंत कदम, आदित्य जोगदंड, भास्कर सरपते, संपत खेमाडे, कालिदास खेमाडे, राजेंद्र खेमाडे, सुनील खेमाडे, गौतम खेमाडे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक, महिला व बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी खीरदान व भोजनदानाचे आयोजन करण्यात आले.

COMMENTS