Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या ठेवी 35 कोटीवर

मार्चअखेर पतसंस्थेला 1 कोटी 5 लाखांचा नफा

राहाता ः येथील जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. के. वाय.गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या आर्थिक वर्ष 2023-24 चे आर्थिक पत्रक पतसंस्थेचे चेअरमन डॉ स्व

संचारबंदी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उतरले रस्त्यावर
नरेंद्राचार्य महाराजांनी भक्तीचा सन्मार्ग दाखविला ः पुष्पाताई काळे
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे ः पो.नि.जाधव

राहाता ः येथील जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. के. वाय.गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या आर्थिक वर्ष 2023-24 चे आर्थिक पत्रक पतसंस्थेचे चेअरमन डॉ स्वाधीन गाडेकर यांनी नुकतेच जाहीर केले ठेवीदारांच्या सुरक्षिततेला सर्वोपरी प्राधान्य देत काटेकोर वसुली केल्याने  पतसंस्थेला 1 कोटी 05 लाख 78 हजार नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.के. वाय. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेची सभासद संख्या 2860 इतकी असून 31 मार्च अखेर ठेवी 35 कोटी आहेत त्यात मागील वर्षीपेक्षा 25 टक्के वाढ झालेली आहे. एकूण कर्ज मागील वर्षीपेक्षा 20 टक्क्यांनी वाढून 31 मार्च अखेर 24 कोटी वाटप करण्यात आलेले आहे. पतसंस्थेची सुरक्षित गुंतवणूक 9 कोटी 84 लाख असून एकूण व्यवसाय 69 कोटी झालेला आहे तर एकूण निधी 1 कोटी 31 लाख असून वसूल भागभांडवल 63 लाख 50 हजार आहे. सीडी रेशोचे प्रमाण 66 टक्के आहे असे डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी जाहीर केले. पतसंस्थेचे संस्थापक संचालक तथा राहात्याचे माजी नगराध्यक्ष डॉ.के.वाय.गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेच्या प्रगती चे श्रेय सर्व सभासद,खातेदार,सर्व संचालक आणि मुख्यतः पतसंस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना जाते असे डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले. ठेवीदारांच्या ठेवींची सुरक्षितता समोर ठेऊन थकीत कर्जदारांकडून कडक वसुली करत संस्थेचे व्यवस्थापक अरुण मेहेत्रे, शाखाधिकारी राधाकिसन भुजबळ, केशव घोगरे, ज्ञानेश्‍वर गाडेकर,रवींद्र सोनटक्के आणि सर्व कर्मचारीवृंद यांनी प्रगतीचा आलेख उंचावला आहे. कोअर बँकिंग सुविधेमुळे खातेदारांना सुलभ आणि तत्पर सेवा पत्संस्थेच्या माध्यमातून देण्यात येते. तसेच मोबाईल बँकिंग, क्यू आर कोड द्वारे भरणा, एसएमएस सेवा, एन ई एफ टी, आर टी जी एस सुविधा, विज बिल भरणा, सुलभ सोनेतारण कर्ज आणि पारदर्शक व्यवहार यांमुळे ठेवी मध्ये वाढ आणि नफा होत आहे असे प्रतिपादन संस्थापक संचालक डॉ. के. वाय. गाडेकर यांनी केले. यावेळी डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन नानासाहेब बोठे, संचालक यशवंत मेहेत्रे, डॉ. विजयकुमार बाकलीवाल, मच्छिंद्र निधाने, विलास अंत्रे, डॉ. शरद वाघमारे, डॉ. शिल्पा गाडेकर, संगिता म्हसे, अँड.धनराज चितळकर, पोपटराव कोल्हे, इंजि. ऋषिकेश सदाफळ आदी उपस्थित होते.

COMMENTS