संगमनेरात एसटी संपाला हिंसक वळण ; अज्ञाताकडून एसटीवर दगडफेक; एक महिला जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात एसटी संपाला हिंसक वळण ; अज्ञाताकडून एसटीवर दगडफेक; एक महिला जखमी

संगमनेर/प्रतिनिधी : एसटी कर्मचारांना राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांचे सुरु असलेल्या आंदोलनाला संगमनेरात हिंस

Haripur – संगमेश्वर देवस्थानची श्रावण सोमवार यात्रा यावर्षी रद्द | LokNews24
शाळेतून विद्यार्थ्यांचा खरा व्यक्तिमत्व विकास : ना.आशुतोष काळे
अरे बापरे…मनपा अधिकार्‍यांनी विकला मनपाचाच भूख़ंड? ; सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा दावा, आयुक्तांकडून चौकशीची ग्वाही

संगमनेर/प्रतिनिधी : एसटी कर्मचारांना राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांचे सुरु असलेल्या आंदोलनाला संगमनेरात हिंसक वळण प्राप्त झाले. आज शनिवारी दि.८ रोजी नाशिक जिल्ह्यातील दोन आगाराच्या दोन वाबनांवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली. यात दोन्ही बसच्या काचा फुटल्या व  दुसर्‍या बसमधील एका महिला प्रवाशाला मोठी दुखापत झाली. या दोन्ही घटनांनंतर हल्लेखोर पसार झाले.याबाबत अधिक माहीती अशी की, आज शनिवार दिनांक ८ रोजी पहिली घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आगाराच्या ‘लोणी-नाशिक’ बससोबत घडला. लोणीहून संगमनेरात आलेली ‘लोणी-नाशिक’ बस क्रमांक एम.एच.१७सी.९५८८ ही बस सकाळी पावणे आठच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात आली. त्यानंतर येथून पुढे नाशिककडे निघाल्यानंतर संगमनेर महाविद्यालयाजवळील ऐश्‍वर्या पेट्रोल पंपाजवळ पोहोचली असता या बसच्या दर्शनीभागावर कोणीतरी अज्ञातांनी दगड फेकून मारले. त्यातील एक दगड बसचालकाच्या समोरील काचेवर आदळल्याने त्यात बसची समोरील काच फुटली.यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळगाव बसवंत पुणे जाणारी बस क्रमांक एमएच १४बीटी०५६५ ही बस संगमनेर पासून पुणे कडे जात असताना चंनापुरी घाटाच्या पायथ्याशी दगाडी बाबा मंदीरा जवळ झाडाच्या आडोशाला उभे राहून एका अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेकला, त्यात बसमधील ३१ वर्षीय प्रवासी महिलेला डोक्यात लागून दुखापत झाली. सदर जखमी महिलेस वृंदावन हॉस्पिटल गुंजाळवाडी येथे औषध उपचारासाठी पाठवण्यात आले असून सदर बसचे वाहक सागर लक्ष्मीकांत बनकर व चालक विक्रम अशोक पाटील हे सुखरूप आहेत. पुढील कारवाई संगमनेर तालुका पोस्टेचे कर्मचारी करत आहेत.

COMMENTS