Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या ’शॉक’मुळे किनवटकर हैराण; शहर अंधारात, जनआंदोलनाचा इशारा!

किनवट : किनवट शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून, महावितरणच्या गलथान कारभाराचा पंचनामा आता थेट निवेदनाद

ठाण्यात शिवशाही बस जळून खाक;15 प्रवासी थोडक्यात बचावले, प्रवाशांत भीतीचे वातावरण
राज्यात उष्णतेचा कहर; अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी
खामगावचे तापमान गेले 45 अंश सेल्सियसवर

किनवट : किनवट शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून, महावितरणच्या गलथान कारभाराचा पंचनामा आता थेट निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि जुनाट यंत्रणेमुळे होणारे नुकसान यावर वेळीच उपाययोजना न केल्यास महावितरण विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात दुपारी वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हातावर पोट असणार्‍या छोट्या यंत्रचालक आणि व्यावसायिकांचे काम ठप्प होत आहे. एकीकडे वाढत्या उष्णतेचा पारा आणि दुसरीकडे घरात पाणी नसल्याने गृहिणींचेही प्रचंड हाल होत आहेत. महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट आहे. महावितरणची उपकरणे अत्यंत जीर्ण झाली असून देखभालीअभावी ती निकामी ठरत आहेत. गेल्या दोन दिवसांत एस.व्ही. कॉलनी परिसर, भाजी मार्केट आणि मोमीनपुरा येथील डी.पी. (रोहित्र) जळण्याच्या घटना घडल्या आहेत. विद्युत तारांमधील स्पार्किंग आणि व्होल्टेजमधील चढ-उतारामुळे नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज यांसारख्या मौल्यवान उपकरणांचे नुकसान होत आहे. सततच्या शॉर्ट सर्किटमुळे डी.पी. शेजारी राहणार्‍या नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नावर भाजपाचे नगरसेवक तथा गटनेता श्रीनिवास किशनराव नेम्मानीवार यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना कडक शब्दांत निवेदन दिले आहे.यावेळी विश्वास कोल्हारीकर, जयराज वर्मा, व इतर उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर वीजपुरवठा तातडीने सुरळीत झाला नाही आणि यंत्रणेची दुरुस्ती केली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. निवेदनानंतर संबंधित विभागाने याची दखल घेत, सर्व कर्मचार्‍यांची बैठक बोलावून शहराच्या देखभाल-दुरुस्तीबाबत सूचना दिल्याचे समजते. मात्र, कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्षात वीजपुरवठा कधी सुधारतो, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS