Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव मध्ये ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अनेक तरुणी? आरोपी यश जैनच्या मोबाईलमध्ये सापडला आक्षेपार्ह व्हिडिओंचा साठा! जळगाव पोलिसांकडून नराधमाला बेड्या!

जळगाव : राज्यात महिलांवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेलिंग करण्याची सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. नाशिक आणि कोल्हापूरच्य

जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच; जामखेड नगरपरिषदमधील घटना; दोघांना तीन दिवसांची कोठडी
भोर येथील चिमुकलीवर अत्याचार व हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध; आरोपीस कठोर शिक्षा द्यावी – डॉ. ज्योती मेटे
कौटुंबिक कलहातून पतीचा काटा काढला; आठ महिन्यांपूर्वीचा खून गेवराई पोलिसांकडून उघड
Crime News - चोरुन काढला दीर अन् वहिणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ, नंतर गावातील  दोघांची 'ती' मागणी; पुढं काय घडलं? - uttar pradesh mathura woman obscene  video with brother in law ...

जळगाव : राज्यात महिलांवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेलिंग करण्याची सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. नाशिक आणि कोल्हापूरच्या घटना ताज्या असतानाच आता जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ काढले आणि तब्बल ७ लाख रुपये उकळले आहेत.
जळगावच्या चाळीसगाव येथील यश महेंद्र जैन या तरुणाला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीने पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी ७ लाख रुपयांची वसुली केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत यश जैनला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती लागली आहे. आरोपी यश जैनचा मोबाईल जप्त केला असता, त्यात केवळ एकाच तरुणीचे नाही, तर इतरही काही तरुणींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याने अजून किती मुलींना अशा प्रकारे ब्लॅकमेल केले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. दुसरीकडे, मुंबईतील बोरिवलीमध्येही दोन तरुणींशी गैरवर्तन करणाऱ्या शॉपिंग सेंटरमधील कर्मचाऱ्यांना मनसेने कडक इशारा दिला असून, महिलांच्या सन्मानासाठी ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे.
जळगावच्या या व्हिडिओ कांडमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, पीडित मुलींनी न घाबरता तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.

COMMENTS