Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाडा ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे सर्व सामान्याचेआरोग्य धोक्यात

तलवाडा प्रतीनिधी आर आर बहिर गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणा मुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व सामान्य नाग

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
Ahmednagar : नगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह (Video)
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे नेवासाफाटा येथे शनिवारी आगमन

तलवाडा प्रतीनिधी आर आर बहिर गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणा मुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व सामान्य नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तलवाडा पोलिस स्टेशन लगट एक पुरातन वेस असुन या वेसीच्या समोर डाव्या बाजूला एक मिल असुन या ठिकाणी जाळीव गट्टु तय्यार होतात. तर दुस-या बाजूला लक्ष्मी आईचे मंदिर व या दोन्हीच्या मधोमध गावातील सांडपाणी वाहणारा नाला असुन या नाल्याच्या वरील भागात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ परिसरातील केर कचरा-याचा आव्वा ढव्वा ढिग, व कच-याच्या ढिगाला कोण्हीतरी अज्ञात व्यक्तीने दिं 7/4/023 रोजी पेटून दिल्याने वेसीच्या डाव्या बाजुला रहिवासी असलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुटलेल्या दुर्गंधी युक्त धुराने गुदमरून येत होते. तर या भागातुन येणा-या जाणा-या वाट सरुंना मोठ्या प्रमाणात या दुर्गंधी युक्त धुराचा त्रास झाल्याचे बोलले जात असुन या कडे तलवाडा ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्याने वेळोवेळी आस्या समस्या उद्भवल्या जात आसल्याचे नागरिकांचे म्हणणे असुन आधीच अंडरग्राऊंड नाली बांधकामच्या नावा खाली गावातील चांगल्या नाल्या व रस्त्याची वाट लागल्याचे नागरिक बोलत असुन याही मुळे आणेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व नळ कनेक्शन फुटल्या तुटल्याने अधुन मधुन नळाला सोडल्या जाणारे पाणी दुषीत येत असल्याने रोगराईत वाढ होण्याची भीती व शक्यता नागरिकातुन व्येक्त केल्या जात असताना ह्या दुर्गंधी युक्त धुराची त्यात भर पढल्याने तलवाडा ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणा मुळे सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्येता जाणकारातुन व्येक्त केल्या जात आहेत.

COMMENTS