Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहूर तालुक्यातील इंग्रजी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष? कारवाईची मागणी

माहूर : कुंभकोणम दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी 5 ऑक्टोबर 2009रोजी जारी केलेल्या 2

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
पाटोदा सुविधा केंद्रात कामगारांची लूट थांबवा; दोषींवर तात्काळ कारवाई करा – सचिन बोबडे
अर्वाच्य भाषा वापरून लोकशाहीचा गळचेपी हीच संस्कृती का?-माकप; आ.संजय गायकवाड, बागेश्वर बाबा प्रकरणी  कारवाईची मागणी-कॉ.अजय बुरांडे
School Safety | Just Ask Your Mom

माहूर : कुंभकोणम दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी 5 ऑक्टोबर 2009रोजी जारी केलेल्या 20 सुरक्षा निर्देशांची माहूर शहरासह तालुक्यातील अनेक इंग्रजी शाळांकडून अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक विनायक उर्फ नंदू संतान व शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सूर्यवंशी यांनी 30 एप्रिल रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात हा मुद्दा उपस्थित केला. निवेदनात जीनियस किड्स, मॉडर्न, सह्याद्री, बालकृष्ण, साई, पोतदार, गुरुकुल (माहूर), द रायझिंग, सुभद्राबाई केशवे तसेच के. रतनलाल राठोड (वाईबाजार) या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या शाळांकडे नॅशनल बिल्डिंग कोडनुसार आवश्यक निकष पूर्ण नसल्याचेही सांगण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणा, पाण्याचा साठा, आपत्कालीन व्यवस्थापन व्यवस्था यांचा अभाव असून, खेळाच्या सुविधाही अपुर्‍या असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरणात शिक्षणाचा अधिकार असतानाही नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शाळांच्या शुल्क संरचनेत पारदर्शकता नसल्याबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून संबंधित शाळांवर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालक व नागरिकांमध्ये या प्रकारामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS