कोपरगाव : तालुक्यातील खरीप हंगाम २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सुमारे १५ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ९

कोपरगाव : तालुक्यातील खरीप हंगाम २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सुमारे १५ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ९.६६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला होता. काढणीच्या तोंडावर असलेली सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर तसेच चारा पिके मोठ्या प्रमाणात पाण्याखाली जाऊन शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता.
या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागामार्फत सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार महायुती शासनाने या मागणीची दखल घेत १५ हजार शेतकऱ्यांना ९.६६ कोटी रुपयांची उत्पादनाधारित नुकसानभरपाई मंजूर केली.
ही आर्थिक मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आगामी खरीप हंगाम २०२६ साठी तयारी करणे सुलभ होणार आहे. आवश्यक भांडवल उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत काही प्रमाणात घट झाली आहे.
दरम्यान, ही नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत. तसेच राज्य शासनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.


COMMENTS