Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड वाघाळा महानगरपालिकेला कचरा व सांडपाणी प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाचे कडक निर्देश

नांदेड : नांदेड वाघाळा शहरातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (छॠढ), पश्‍चिम विभाग खंडपीठ, पुणे यांनी मह

नाशिक कुंभमेळ्याची मोठी अपडेट! ऐतिहासिक रामकुंड परिसर पुढील २ महिन्यांसाठी पूर्णपणे बंद; ‘या’ ठिकाणी होणार धार्मिक विधी!
संवत्सर पुलाच्या दुरुस्तीला प्रारंभ; आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश
गेवराई पोलीसांची मोठी कारवाई; म्हाळसपिंपळगाव शिवारात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा उघड, दोन ट्रॅक्टर जप्त

नांदेड : नांदेड वाघाळा शहरातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (छॠढ), पश्‍चिम विभाग खंडपीठ, पुणे यांनी महानगरपालिकेला महत्त्वपूर्ण व कडक निर्देश दिले आहेत. नांदेड येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्या जयमाला ढाणकीकर यांनी दाखल केलेल्या अर्ज क्र. 92/2025 (थन) वर 27 एप्रिल 2026 रोजी सुनावणी झाली. या सुनावणी मध्ये महानगरपालिकेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात प्रशासनाने शहरातील कचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच पर्यावरणीय नुकसान भरपाई (एऊउ) आकारू नये, अशी मागणीही करण्यात आली. मात्र, या प्रतिज्ञापत्रावर संयुक्त समितीच्या अहवालासंदर्भात आक्षेप नोंदवण्यात आले. सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्राची प्रत अर्जदार व इतर वकिलांना न मिळाल्याचा मुद्दा समोर आला. प्रतिवादीकडे प्रत पाठवल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे न्यायाधिकरणाने हे प्रतिज्ञापत्र नोंदणीकृत पोस्ट व ई-मेलद्वारे पाठवून त्याचा पुरावा आठवडाभरात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
यासोबतच, सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नांदेड वाघाळा महानगरपालिकेने गोदावरी नदीच्या पर्यावरणाविषयी केलेल्या कामांची अद्ययावत माहिती दिली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महानगरपालिकेला एका आठवड्याच्या आत अद्ययावत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर अर्जदारांना दोन आठवड्यांच्या आत प्रत्युत्तर दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी 29 जुलै 2026 रोजी निश्‍चित करण्यात आले आहे. न्यायिक सदस्य दिनेशकुमार सिंग आणि तज्ञ सदस्य डॉ. सुजितकुमार बाजपेयी यांनी हे आदेश दिले. अलीकडेच काही दिवसापूर्वी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येणार्‍या सांडपाण्याच्या नाल्यावर योग्य ती प्रक्रिया करून पाणी सोडले जात असल्याचा दावा केला होता. या प्रकरणामुळे नांदेड शहरातील पर्यावरणीय व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली आहे.

महापालिकेचे आयुक्त डोईफोडे यांनी केलेला दावा
नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ’100 दिवसांचा कृती आराखडा’ तयार करण्यात आला असुन या आराखड्यात नदी प्रदुषण मुक्त कामाचा समावेश आहे. नांदेड शहरातुन वाहणा-या गोदावरी नदीमध्ये नैसर्गिक नाले वाहुन येतात सदर वाहुन येणा-या नाल्यांपैकी बिलालनगर नाला, सिध्दार्थ नगर नाला, नावघाट नाला, कालापुल नाला, गाडीपुरा नाला, शनिमंदिर नाला, बंदाघाट नाला हे प्रमुख नाले आहेत. गोवर्धन घाट ते छठ-झ मलउपसा केंद्रापर्यंत गोदावरी नदीच्या समांतर मलनिःस्सारण वाहिण्यांचे पाणी घेवुन जाण्यासाठी मलनिःस्सारण वाहिणी कार्यान्वित होती. परंतु कालांतराने नदीमध्ये गाळ प्रवाहित होवुन सदर मलनिस्सारण वाहिणी क्षतिग्रस्त झाली आहे.

COMMENTS