Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेरूळ लेणीत मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला

छ.संभाजीनगर : अंजिठा लेणीत पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याच्या घटना ताज्या असतांनाच रविवारी जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात सकाळी मधमाशांनी पर्यट

जगावर ‘हंता’ व्हायरसचं संकट; क्रुझवर मृत्यूचा थरार! भारत अलर्ट मोडवर, १६५ प्रयोगशाळांमध्ये युद्धपातळीवर तयारी सुरू!
घसरगुंडी कोसळून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
उष्णतेमुळे आजारांचा फैलाव; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन-वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बोधनकर

छ.संभाजीनगर : अंजिठा लेणीत पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याच्या घटना ताज्या असतांनाच रविवारी जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात सकाळी मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत 50 ते 100 पर्यटकांना किरकोळ डंख लागले असून सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. रविवार असल्याने वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळी 10 ते 11 च्या सुमारास लेणी क्रमांक 10 व 16 पाहण्यासाठी पर्यटक पोहोचले असता, त्याचवेळी मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये घबराट पसरली. लहान मुले व वृद्ध पर्यटकांना बाहेर काढताना मोठी तारांबळ उडाली.

COMMENTS