Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान नगर येथे उत्साहात ध्वजारोहण

केज : मौजे जोला (ता. केज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान नगर येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित

सूर्यकांत काळे यांच्यासारख्या शिक्षकांची समाजाला गरज-खा.बजरंग सोनवणे;केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा थाटात; शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
उमरी/सावंतवाडी प्रीमियर लीगवर ‘यजमान’ उमरी संघाचे वर्चस्व; दहीटना उपविजेता! विष्णुभाऊ घुले यांच्या हस्ते 51,111 चे प्रथम पारितोषिक प्रदान
उमरी-सावंतवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत यजमान संघाची बाजी; प्रथम क्रमांकावर कब्जा

केज : मौजे जोला (ता. केज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान नगर येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात एकल भगिनी सौ. सुनिता रत्नाकर ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा इतिहास, महाराष्ट्र दिनाचे महत्त्व तसेच सामाजिक एकात्मता आणि शैक्षणिक प्रगती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मुरलीधर ढाकणे, शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव ढाकणे, सहशिक्षक संदीप आणेराव, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे, अंगणवाडी कार्यकर्ती सविता सारुक तसेच गावातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, घोषवाक्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राज्याविषयी अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मुख्याध्यापक बाबुराव ढाकणे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या शिक्षकवर्ग व ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना शुभेच्छा देत समारोप करण्यात आला.
एकल महिलांच्या सक्षमीकरणावर सामाजिक कार्यकर्त्यांचे मत
याच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे यांनी एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाबाबत आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, एकल महिलांना केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक आधाराचीही तितकीच गरज आहे. त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित वातावरण आणि समान संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांनी विविध योजना प्रभावीपणे राबवून या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्यविकास, स्वयंरोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांनी संवेदनशीलतेने पुढे येत एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सहकार्य करणे ही काळाची गरज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS