Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात जखमी हरिणाचा मदतीअभावी मृत्यू; नागरिकांचा वन विभागावर संताप

श्रीगोंदा :  तालुक्यातील आढळगाव येथील खैरओढा परिसरात राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत गुरुवारी दुपारी सुमारे पावणे पाचच्या सुमारास एका मादी हरिणाचा मदतीअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या या हरिणाने तब्बल दीड तास जीवासाठी झुंज दिली; मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा अंत झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गालगत जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या हरिणाची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाच्या हेल्पलाईनवर वारंवार कळविण्यात आले. काही संवेदनशील नागरिकांनी घटनास्थळी थांबून हरिणाला मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, दीड तास उलटूनही वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. दरम्यान, गंभीर जखमांमुळे हरिणाची प्रकृती खालावत गेली आणि उपचाराच्या प्रतीक्षेतच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळाने वनमजूर घटनास्थळी दाखल झाला; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मृत हरिणाला पुढील प्रक्रियेसाठी ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. “रस्त्यांच्या कामासाठी किंवा हद्दीच्या वादासाठी तत्परतेने धावणारा वन विभाग, वन्यजीवांच्या जीविताच्या प्रश्नावर मात्र का निष्क्रिय ठरतो?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जखमी वन्यप्राण्यांना वेळेत मदत मिळाल्याची उदाहरणे आहेत, जिथे वन विभाग तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करतो . मात्र श्रीगोंद्यातील या घटनेत झालेल्या विलंबामुळे एका निष्पाप प्राण्याचा जीव गेल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिकांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

अवजड वाहनाच्या धडकेने ट्रान्सफॉर्मर जळून खाक; राहुरीत तीन दिवस अंधार; गुन्हा नोंद न झाल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बीडकरांना वेठीस धरणारा मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव, बीड जिल्हा बचावराष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट कामांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने-डॉ.गणेश ढवळे
एकाच दिवशी 2 दिग्गज कलाकारांचा अपघाती अंत निर्माते आर. बी. चौधरी आणि अभिनेते संतोष नायर यांचे निधन

श्रीगोंदा :  तालुक्यातील आढळगाव येथील खैरओढा परिसरात राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत गुरुवारी दुपारी सुमारे पावणे पाचच्या सुमारास एका मादी हरिणाचा मदतीअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या या हरिणाने तब्बल दीड तास जीवासाठी झुंज दिली; मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा अंत झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गालगत जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या हरिणाची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाच्या हेल्पलाईनवर वारंवार कळविण्यात आले. काही संवेदनशील नागरिकांनी घटनास्थळी थांबून हरिणाला मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, दीड तास उलटूनही वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही.

दरम्यान, गंभीर जखमांमुळे हरिणाची प्रकृती खालावत गेली आणि उपचाराच्या प्रतीक्षेतच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळाने वनमजूर घटनास्थळी दाखल झाला; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मृत हरिणाला पुढील प्रक्रियेसाठी ताब्यात घेण्यात आले.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. “रस्त्यांच्या कामासाठी किंवा हद्दीच्या वादासाठी तत्परतेने धावणारा वन विभाग, वन्यजीवांच्या जीविताच्या प्रश्नावर मात्र का निष्क्रिय ठरतो?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जखमी वन्यप्राण्यांना वेळेत मदत मिळाल्याची उदाहरणे आहेत, जिथे वन विभाग तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करतो . मात्र श्रीगोंद्यातील या घटनेत झालेल्या विलंबामुळे एका निष्पाप प्राण्याचा जीव गेल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

स्थानिकांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

COMMENTS