शेवगाव : गदेवाडी (ता. शेवगाव) परिसरातील एमएसईबी सबस्टेशनवर झालेल्या जबरी चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीची कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण ५ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी चापडगाव येथील एमएसईबी सबस्टेशनमध्ये घुसून वॉचमन गोकुळ संपत मडके (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) यांच्यावर लाकडी दांडके व लोखंडी गजाने हल्ला केला. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून सुमारे ९९० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल व ५३० किलो कॉपर कॉईल असा एकूण ९८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान हा गुन्हा बीड येथील सराईत गुन्हेगार भिमा लक्ष्मण म्हस्के व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शेवगाव शहराजवळील वरुरु चौक येथे शनिवार दि २ रोजी सापळा रचून संशयित वाहन अडवण्यात आले. वाहनातील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे भिमा लक्ष्मण म्हस्के (वय ३८, रा. बीड), अविनाश कल्याण धुरंधरे (वय ३७) आणि अमोल गणेश रांजवण (वय ३६) अशी सांगितली. त्यांच्या झडतीत १० किलो कॉपर कॉईल (३० हजार रुपये), तीन मोबाईल (४१,१०० रुपये), चोरीसाठी वापरलेले साहित्य (१,६०० रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार (५ लाख रुपये) असा एकूण ५,७२,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी भिमा म्हस्के याने आणखी एका चोरीची कबुली दिली असून चापडगाव येथील जिनिंग प्रेसमधील डीपी फोडून कॉपर कॉईल चोरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भिमा म्हस्के हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राज्यभरात ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

शेवगाव : गदेवाडी (ता. शेवगाव) परिसरातील एमएसईबी सबस्टेशनवर झालेल्या जबरी चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीची कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण ५ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी चापडगाव येथील एमएसईबी सबस्टेशनमध्ये घुसून वॉचमन गोकुळ संपत मडके (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) यांच्यावर लाकडी दांडके व लोखंडी गजाने हल्ला केला. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून सुमारे ९९० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल व ५३० किलो कॉपर कॉईल असा एकूण ९८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान हा गुन्हा बीड येथील सराईत गुन्हेगार भिमा लक्ष्मण म्हस्के व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शेवगाव शहराजवळील वरुरु चौक येथे शनिवार दि २ रोजी सापळा रचून संशयित वाहन अडवण्यात आले.
वाहनातील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे भिमा लक्ष्मण म्हस्के (वय ३८, रा. बीड), अविनाश कल्याण धुरंधरे (वय ३७) आणि अमोल गणेश रांजवण (वय ३६) अशी सांगितली. त्यांच्या झडतीत १० किलो कॉपर कॉईल (३० हजार रुपये), तीन मोबाईल (४१,१०० रुपये), चोरीसाठी वापरलेले साहित्य (१,६०० रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार (५ लाख रुपये) असा एकूण ५,७२,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी भिमा म्हस्के याने आणखी एका चोरीची कबुली दिली असून चापडगाव येथील जिनिंग प्रेसमधील डीपी फोडून कॉपर कॉईल चोरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भिमा म्हस्के हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राज्यभरात ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

COMMENTS