Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी; ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी; काँगे्रस देणार उमेदवार

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा सुरू झाली आहे. भ

घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आ. बच्चू कडूंवर टीकास्त्र
काँगे्रसची माघार, ठाकरेंची अखेर सरशी; विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 अर्ज दाखल; शिवसेनेकडून बच्चू कडू, डॉ. गोर्‍हे यांना संधी
समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात झालेली गळाभेट..
Ambadas Danve Vidhan Parishad Candidature; Uddhav Thackeray MVA Lead

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा सुरू झाली आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र काँगे्रस देखील आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसंदर्भात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. विशेषतः पक्षप्रमुख णववहर्रीं ढहरलज्ञशीरू यांचे नाव चर्चेत होते. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांकडूनही त्यांनाच विधानपरिषदेवर पाठवण्याचा आग्रह व्यक्त केला जात होता. मात्र अखेर या चर्चांना विराम देत पक्षाने अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याबाबतची अधिकृत माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, अंबादास दानवे हेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेचे उमेदवार असतील. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची इच्छा उद्धव ठाकरे यांनीच विधानपरिषदेत जावे अशी होती. शिवसेनेतील काही पदाधिकार्‍यांनीही त्यांचे नाव पुढे केले होते. मात्र पक्षांतर्गत चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाला प्राधान्य दिले. त्यामुळे आता तेच अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील. पक्षाच्या माहितीनुसार, अंबादास दानवे हे लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे विधानपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ संपुष्टात आला होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. आता या निर्णयामुळे त्या प्रश्‍नावरही पडदा पडला आहे.

COMMENTS