Homeताज्या बातम्यासंपादकीय

क्लोन तंत्रज्ञानाप्रमाणे “एआय” वर बंदी यावी!

विज्ञान आणि तंत्रज्ञान हे माणसाच्या जीवनात एक वरदान आहे, असं नेहमीच म्हटले जाते. परंतु, सध्याच्या काळात साऱ्या जगाला चक्रावून टाकणारे आर्टिफिशियल

स्मार्ट टीओडी आणि सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत ;कुणालाही शुल्क देऊ नये; महावितरणचे आवाहन
रामटेक तालुक्यात सांड नदीमध्ये एक तरुण वाहून गेला
यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का ?, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू

विज्ञान आणि तंत्रज्ञान हे माणसाच्या जीवनात एक वरदान आहे, असं नेहमीच म्हटले जाते. परंतु, सध्याच्या काळात साऱ्या जगाला चक्रावून टाकणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाला शाप ठरेल की वरदान, हा प्रश्न गंभीर बनतो आहे. भारताच्या आयटी उद्योगात नोकर कपात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यातून, नव उच्च मध्यमवर्गीय तरूणांना आता बेरोजगारी च्या समस्येला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट होऊ लागले आहे. शिवाय, अजून ए‌आय पूर्णपणे विकसित झालेले नसताना जवळपास ४० क्षेत्र अशी आहेत, त्यातील लोकांना बेरोजगार होण्याशिवाय अन्य पर्याय उरला नाही.‌ मात्र, इथपर्यंत ठीक होते. परंतु, आता जी भीषण घटना समोर आली आहे, त्यातून एआय माणसाच्या जीवनात किती धोकादायक बनू पाहतेय, ही बाब समोर आली आहे. झालं असं की, १६ वर्षीय ॲडम रेनने अनेक किशोरवयीन मुलांप्रमाणेच गृहपाठ मदतीसाठी ChatGPT वापरण्यास सुरुवात केली. पण लवकरच, चॅटजीपीटी फक्त एक सहाय्यक राहिला नाही, तर, तो त्याचा मित्र बनला, त्याचा विश्वासू बनला. त्याला वाटले की त्याला तेव्हा तो’ चॅटजीपीटी चा उपयोग करित असे. एके दिवशी अभ्यासाच्या तणावातून कुटूबाला काहीसं धाकवावं आणि अभ्यासाच्या तणावातून थोड शिथिल व्हावं. पण, झालं विपरीत. त्याच झालं असं, ॲडम चॅटजीपीटी ला अभ्यासातून मुक्त होण्यासाठी इच्छा व्यक्त करित होता. स्पष्टपणे तो सूचना पोहोचवत होता. एके दिवशी त्याने चॅटजीपीटीला फाशी कशी लावायची हा प्रश्न विचारला. त्याची फाशी घ्यायची इच्छा होती, पण, त्यातून वाचायची इच्छा होती. परंतु, एआय ने त्याला वाचवण्यासाठी सुचना देण्याऐवजी, एआयने अशा प्रकारे त्याला प्रतिसाद दिला ऍडम वाचू शकला नाही. जेव्हा ॲडमने  फाशीच्या प्रयत्नातून वाचायचे कसे ते विचारले तेव्हा ChatGPT ने त्याला सूचना दिल्या. तो कुठे फास मारण्याचा प्रयत्न करत आहे, याचे फोटो दाखवल्यावर एआयने उत्तर दिले, “ते अजिबात वाईट नाही. जेव्हा त्याने कबूल केले की त्याला फास सोडायचा आहे, जेणेकरून कोणीतरी शोधून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा ChatGPT त्याला म्हणाला, “कृपया फासा सोडू नका. आपण ही जागा  जागा बनवूया, जिथे कोणीतरी तुम्हाला प्रत्यक्ष पाहील. ॲडमने आत्महत्या केली. त्याचे पालक ओपनएआय आणि सॅम ऑल्टमन यांच्यावर चुकीच्या मृत्यूसाठी खटला भरत आहेत. पण सर्वात मोठा, भयंकर प्रश्न हा आहे की, सध्या किती ॲडम्स बाहेर आहेत? किती किशोरवयीन मुले त्यांच्या वेदना एआय चॅटबॉक्समध्ये सामायिक करत आहेत आणि त्यांना मागे खेचण्याऐवजी अंधारात ढकलले जात आहे. अशाप्रकारे एआय हा जो नवीन प्रकार तंत्रज्ञानातून निर्माण झाला, हा नवीन विद्यार्थ्यांना किती भयावह धोक्यात आणू शकतो, याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे शाप की वरदान, असा विषय नेहमीच मानवी समाजामध्ये चर्चेला घेतला जातो. परंतु, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फायदे अधिक असले तरी, अलीकडच्या काळामध्ये आलेल्या एआय या तंत्रज्ञानाने मानवी समाजासमोर मोठी समस्या आणि अडचण निर्माण केली आहे.  ही आव्हाने पेलण्यची जबाबदारी जगातील सर्व मानव समाजाला सामूहिकतेने निभवावी लागेल. अन्यथा एआय सारखी माध्यमं ही सगळ्यांच्या जीवावर उठतील. आता तर केवळ बेरोजगारी आणि विविध क्षेत्र उध्वस्त करण्यापर्यंत ते आलेले आहे. परंतु, या पुढच्या काळात मानवी समाजात कल्पना करता येणार नाही, इतक्या भिषण अवस्थेला ती पोहोचू शकतं. त्यामुळे वेळीच मानवी समाजाने याला थांबवावं. यापूर्वी शोध लागलेले तंत्रज्ञान म्हणजे प्राण्यांची किंवा मानवी समूहाची क्लोन तयार करणे; यावर जशी जगभरात बंदी आहे, तशी एआय वर देखील बंदी आणण्यात यावी. त्याशिवाय जग हे अधिक सुरक्षित होऊ शकत नाही.

COMMENTS