Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ : मूल्यमापन समितीवर पत्रकार गोविंद टेकाळे यांची निवड

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी विशेष समितीची स्थाप

मोहटादेवी देवस्थानचा पदभार धर्मादाय उपायुक्तांकडे  
मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधानभवनातइंधन बचतीचा संदेश ; मंत्री गिरीश महाजनांचा विमानप्रवास
पश्‍चिम आशियाई संकटाच्या पार्श्‍वभूमीवरराज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर



महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पत्रकार प्रतिनिधी म्हणून गोविंद टेकाळे यांची निवड करण्यात आली आहे.
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार तसेच जिल्हा परिषद नांदेड येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार ही समिती गठित करण्यात आली आहे. सदर समिती चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायतींना दि. 26 एप्रिल ते 17 मे 2026 या कालावधीत प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामे, सेवा सुविधा आणि प्रशासकीय पारदर्शकतेची तपासणी करणार आहे. गटविकास अधिकारी यू. डी. तोटावाड यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विविध विभागांतील अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. देसाई, गट शिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. पी. माने, कृषी अधिकारी एन. जी. सूर्यभान, उपअभियंता एच. डी. घोडके, आर. डी. रावसाहेब, विस्तार अधिकारी पी. एन. गर्जे तसेच सहायक गटविकास अधिकारी श्रीमती वंदना देशमुख यांचा समावेश आहे. या समितीत पत्रकार प्रतिनिधी म्हणून गोविंद गणपतराव टेकाळे यांची निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सखाराम क्षीरसागर, माजी अध्यक्ष फिरदोस हुसेनी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS