Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एनएमएमएस’ परीक्षेत वेदिका सूर्यवंशी तालुक्यात प्रथम

कर्जत : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेत मिरजगाव येथील पीएम श्री शाळेतील विद्यार्थिनी  वेदिका ज्योती सुभाष सूर्यवंशी हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वेदिकाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्यात सहावा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेत वेदिकाने एकूण 179 गुणांपैकी 157 गुण मिळवत उत्तीर्णता मिळवली. मानसिक क्षमता चाचणी  मध्ये 83 तर शैक्षणिक क्षमता चाचणी मध्ये 74 गुण मिळवत तिने उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या या यशामुळे मिरजगाव परिसरात तसेच शाळेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वेदिका ही अभ्यासू, जिद्दी व मेहनती विद्यार्थिनी असून तिच्या यशामागे तिचे आई-वडील तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य मेहनत आणि मार्गदर्शनाच्या जोरावर मोठे यश मिळवू शकतात, हे वेदिकाने सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

निंभोरे पाटील परिवारातील ज्येष्ठांचा अभिष्टचिंतन सोहळा
श्रीरामपूर खंडाळा येथील आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद
वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांची गय नाही; पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी; जामखेड पोलिसांची मुख्य रस्त्यावर विशेष मोहीम

कर्जत : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेत मिरजगाव येथील पीएम श्री शाळेतील विद्यार्थिनी  वेदिका ज्योती सुभाष सूर्यवंशी हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वेदिकाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्यात सहावा क्रमांक मिळवला आहे.

या परीक्षेत वेदिकाने एकूण 179 गुणांपैकी 157 गुण मिळवत उत्तीर्णता मिळवली. मानसिक क्षमता चाचणी  मध्ये 83 तर शैक्षणिक क्षमता चाचणी मध्ये 74 गुण मिळवत तिने उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या या यशामुळे मिरजगाव परिसरात तसेच शाळेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेदिका ही अभ्यासू, जिद्दी व मेहनती विद्यार्थिनी असून तिच्या यशामागे तिचे आई-वडील तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य मेहनत आणि मार्गदर्शनाच्या जोरावर मोठे यश मिळवू शकतात, हे वेदिकाने सिद्ध करून दाखवले आहे.

तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS