Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्यात वाहने उभी करणे महागात, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वाहतुकीस अडथळा होत असल्याने पोलिसांनी केली कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी ः रस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा करण्यासह लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणार्‍या दोन वाहनांच्या चालकांविरुध्द पोलिसां

बोकड कापण्याच्या सुर्‍याने तरुणावर जीवघेणा हल्ला
गुरुवर्यांच्या हस्ते झालेला सत्कार सेवाकार्याला बळ देणारा
आमदार लंकेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डीत रस्ता रोको

अहमदनगर/प्रतिनिधी ः रस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा करण्यासह लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणार्‍या दोन वाहनांच्या चालकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तोफखाना व कोतवाली पोलिसांनी स्वतंत्रपणे कारवाई करीत दोन गुन्हे दाखल केले आहेत. तोफखाना पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध वाहतुकीस अडथळा होईल असे चार चाकी वाहन उभे करणार्‍याविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे तर रस्त्याच्या मध्यभागी कार उभी करणार्‍याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अवैध धंदे व अनुचित प्रकार यांना प्रतिबंध करण्यासाठी तोफखाना पोलिस पेट्रोलिंग करीत फिरत असताना त्यांना सावेडीतील पाईपलाईन रोडवर वाणीनगर कमानीच्या पुढे एक चारचाकी गाडी (क्र.एमएच 16 एवाय 9868) ही येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना अपघात व अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर उभी असलेली दिसली. म्हणून गाडी चालकास रस्त्यातून गाडी बाजूला करण्यास सांगितले असता त्याने गाडी बाजूला न केल्याने गाडी चालक शाहरूख लियाकत पठाण (वय 26 वर्ष, धंदा- नारळ विक्रेता, रा. भिंगारदिवेमळा, सावेडी अ.नगर) याच्याविरुद्ध तोफखाना पोलिसांनी कॉन्स्टेबल सावळेराम क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली.

दुसरी घटना माळीवाड्यात – माळीवाड्यातील महावीर कलादालन समोर ओमेनी कार (क्रमांक एमएच 12 एफपी 2884) ही वाहतुकीस अडथळा निर्माण होईल व येणार्‍या-जाणार्‍या लोकांच्या जीवितास धोका होईल, अशी रस्त्याच्या मधोमध उभी असताना मिळून आल्याने ओमेनी चालक असिफ दाउद बैग (वय 22 वर्षे, धंदा चालक, रा. मधमेश्‍वरनगर, नेवासा ता. नेवासा. जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध कॉन्स्टेबल श्रीकांत खताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

COMMENTS