Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवाजी महाराजांवरील वक्तव्यांविरोधात श्रीगोंद्यात तिरडी आंदोलन; संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचा निषेध; कारवाईची मागणी

श्रीगोंदा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधार्थ येथे संभाजी ब्रिगेड, समविचारी संघटना व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. धिरेंद्र शास्त्री (बागेश्वर महाराज) व आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदविला. शहरातील शनी चौक येथून आंदोलनाची सुरुवात झाली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक हातात फलक घेत घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाकडे मोर्चा काढला. “शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही” तसेच “वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले ते प्रतीकात्मक तिरडी आंदोलन. आंदोलनकर्त्यांनी तिरडी बांधून ती तहसील कार्यालयाजवळील मुतारी परिसरात नेऊन प्रतीकात्मकरीत्या विसावा दिला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर श्रद्धांजली अर्पण करून निषेध व्यक्त करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी धिरेंद्र शास्त्री व संजय गायकवाड यांच्यावर टीका करत इतिहास व महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या संदर्भातील कोणतेही चुकीचे वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. आम आदमी पार्टीचे नेते राजेंद्र नागवडे यांनीही आंदोलनात सहभागी होत निषेध नोंदविला व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी नागपूर येथे केलेल्या वक्तव्याचा तसेच आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला. या आंदोलनात बामसेफचे सुभाष बोराडे, सत्यशोधक विचारवंत भीमराव कोथिंबीर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष वैभव मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते बंडूतात्या जगताप, शहराध्यक्ष अभिषेक सावंत, अजिजभाई शेख, जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे, जिल्हा संघटक गणेश पारे, दीपक मुखरे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाकडे निवेदन देत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

कांगोणी फाटा परिसरात ट्रॅक्टर-बसची भीषण धडक; एकाचा मृत्यू
म्हैसगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रध्वज उतरविण्याचा विसर
कर्जत तालुक्यात बोगस ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट; प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांची फसवणूक ; कारवाईची मागणी

श्रीगोंदा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधार्थ येथे संभाजी ब्रिगेड, समविचारी संघटना व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. धिरेंद्र शास्त्री (बागेश्वर महाराज) व आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदविला.

शहरातील शनी चौक येथून आंदोलनाची सुरुवात झाली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक हातात फलक घेत घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाकडे मोर्चा काढला. “शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही” तसेच “वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले ते प्रतीकात्मक तिरडी आंदोलन. आंदोलनकर्त्यांनी तिरडी बांधून ती तहसील कार्यालयाजवळील मुतारी परिसरात नेऊन प्रतीकात्मकरीत्या विसावा दिला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर श्रद्धांजली अर्पण करून निषेध व्यक्त करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी धिरेंद्र शास्त्री व संजय गायकवाड यांच्यावर टीका करत इतिहास व महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या संदर्भातील कोणतेही चुकीचे वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

आम आदमी पार्टीचे नेते राजेंद्र नागवडे यांनीही आंदोलनात सहभागी होत निषेध नोंदविला व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी नागपूर येथे केलेल्या वक्तव्याचा तसेच आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला.

या आंदोलनात बामसेफचे सुभाष बोराडे, सत्यशोधक विचारवंत भीमराव कोथिंबीर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष वैभव मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते बंडूतात्या जगताप, शहराध्यक्ष अभिषेक सावंत, अजिजभाई शेख, जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे, जिल्हा संघटक गणेश पारे, दीपक मुखरे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाकडे निवेदन देत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

COMMENTS