Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराईत आदर्श पायंडा: महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समन्वयातून सन्मानपूर्वक स्थलांतरित

गेवराई : गेवराई शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील शिवाजी चौकात अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पु

उमापूर येथून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका
पिंपळनेर येथील जि.प. शाळेच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ;आ. विजयसिंह पंडितांनी वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी 77 लाखांचा निधी मंजूर करुन आणला
कवडगाव (खेडकर वस्ती) येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात  प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

गेवराई : गेवराई शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील शिवाजी चौकात अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 25 एप्रिल रोजी पहाटे प्रशासकीय समन्वयातून आणि शिवप्रेमींच्या सहकार्याने सन्मानपूर्वक स्थलांतरित करण्यात आला. या निर्णयामुळे महामार्गावरील वाहतुकीचा दीर्घकाळचा अडथळा दूर झाला असून जिल्ह्यात समन्वयातून प्रश्न सोडवण्याचा सकारात्मक संदेश गेला आहे.
21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास शिवाजी चौकात हा पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आला होता. बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात असल्याने आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हा पुतळा अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका आणि तहसील प्रशासनासोबत सातत्याने बैठका घेऊन स्थानिक शिवप्रेमी आणि नागरिकांशी संवाद साधण्यात आला. या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिक सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि शिवप्रेमींनी सहकार्य दर्शवले आणि स्थलांतरास संमती दिली. आज सकाळी 6 वाजल्यापासून कडक पोलीस बंदोबस्तात आणि सर्व संबंधितांच्या उपस्थितीत पुतळ्याचे नवीन चबुतर्‍यावर सन्मानपूर्वक स्थलांतर करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, भविष्यात कोणतेही स्मारक किंवा पुतळा उभारताना प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. बेकायदेशीर बांधकामांऐवजी समन्वयातून तोडगा काढण्याची ही घटना एक आदर्श ठरावी, असेही त्यांनी नमूद केले. या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतलेल्या शिवप्रेमी व नागरिकांचा लवकरच पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष सन्मान केला जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS