अकोले : रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोतुळ (ता. अकोले) येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत विद्यालयाचा झेंडा रोवला आहे. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सौरभ लक्ष्मण गवारी आणि मोहिनी जालिंदर गवारी या दोन विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या मानाच्या शिष्यवृत्तीवर आपले नाव कोरले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. या यशामुळे अकोले तालुक्यात विद्यालयाने आपले ‘नंबर १’ स्थान पुन्हा अधोरेखित केले आहे. जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर विद्यार्थ्यांनी कोतुळ पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे विद्यालयाचे प्राचार्य बी. के. देशमुख आणि पर्यवेक्षक यु. एम. पाळंदे यांच्या नियोजनाचा मोठा वाटा आहे. विभाग प्रमुख ए. एस. सारोक्ते तसेच मार्गदर्शक शिक्षक पी. डी. पंडित, एस. पी. गोरडे, एच. एल. कोकतरे यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी कठीण विषयांवर मात केली. ज्येष्ठ शिक्षक जे. बी. गोडे यांचेही विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले आहे.

अकोले : रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोतुळ (ता. अकोले) येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत विद्यालयाचा झेंडा रोवला आहे. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सौरभ लक्ष्मण गवारी आणि मोहिनी जालिंदर गवारी या दोन विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या मानाच्या शिष्यवृत्तीवर आपले नाव कोरले आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. या यशामुळे अकोले तालुक्यात विद्यालयाने आपले ‘नंबर १’ स्थान पुन्हा अधोरेखित केले आहे. जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर विद्यार्थ्यांनी कोतुळ पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे विद्यालयाचे प्राचार्य बी. के. देशमुख आणि पर्यवेक्षक यु. एम. पाळंदे यांच्या नियोजनाचा मोठा वाटा आहे. विभाग प्रमुख ए. एस. सारोक्ते तसेच मार्गदर्शक शिक्षक पी. डी. पंडित, एस. पी. गोरडे, एच. एल. कोकतरे यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी कठीण विषयांवर मात केली. ज्येष्ठ शिक्षक जे. बी. गोडे यांचेही विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन लाभले.
या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले आहे.

COMMENTS