Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेदरलँडच्या संशोधिकेची गारगोटी संग्रहालयाला भेट

अकोले : नेदरलँड येथून आलेली हॅना ब्रदर वैगनिंगन आणि हैदराबाद मधून आलेले तारकराम यांनी नुकतीच ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ रमाकांत डेरे यांच्या राजूर य

भाजप कार्यकर्त्यांनी रोजगार निर्मितीकडेही लक्ष द्यावे;प्रदीप पेसकर ; ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ उत्साहात
‘मुळा’त नवीन पाणी आणल्याशिवाय पठार भागाला पाणी नाही : आमदार डॉ. किरण लहामटे ; विविध विकासकामांचे लोकार्पण
डॉ. आंबेडकरांचे उपकार विसरू नयेत : चौरे 

अकोले : नेदरलँड येथून आलेली हॅना ब्रदर वैगनिंगन आणि हैदराबाद मधून आलेले तारकराम यांनी नुकतीच ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ रमाकांत डेरे यांच्या राजूर येथील गारगोटी संग्रहालय तसेच जुन्या काळातील नाणी व पोस्टाची तिकिटे तसेच निसर्गातील विविध आकार असलेल्या लाकडांच्या प्रदर्शन दालनाला भेट दिली.

बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून  डेरे यांचा सर्वांना परिचय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत  नेदरलँड येथून आलेली  हॅना ब्रदर वैगनिंगन यांनी त्यांची राजुर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे विविध प्रयोग समजावून घेतले. समाजाप्रती असलेले त्यांचे विचार व कार्य सुमारे तीन तास वेळ देऊन  जवळून बघितले. या भेटीचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणे व येथील जीवनचरित्रार्थ कशाप्रकारे चालतो , शेती आणि शेतीपूरक व्यवसाय , ग्रामीण आणि आदिवासी संस्कृती , या सर्व बाबींचा अभ्यास त्यांनी जवळून केला. या भेटीदरम्यान भारत देशातील अनेक आठवणी सोबत घेऊन जात आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळेस काढले.

शेतीतज्ज्ञ रमाकांत डेरे यांचे ‘मॉडेल’ जगप्रसिद्ध

दगडांचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच चंदन लागवडीला राजआश्रय मिळवून देणारे ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ रमाकांत डेरे गेली पाच ते सहा दशके विविध क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. शेतकऱ्यांचे व आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेले रमाकांत डेरे यांच्याकडे विविध क्षेत्रातील मान्यवर भेटी देत असतात. त्यांचे सावरकुटे या आदिवासीबहुल गावातील फळबाग लागवडीचा प्रयोग देशभर गाजलेला आहे. नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर करून जीवनमान उंचावण्यासाठी फळबाग लागवडीतून स्थायी रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी उभे केलेले मॉडेल सर्वांना प्रेरणा देणारे आहे. चंदन शेतीच्या माध्यमाने हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पर्यावरण पूरक शेतीचा मार्ग त्यांनी दाखवला आहे. 

COMMENTS