कीर्तन ऐकायचंय…मग मोबाईल आणू नका…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कीर्तन ऐकायचंय…मग मोबाईल आणू नका…

इंदुरीकरांची बंदी चर्चेत, संयोजकांवर आता जबाबदारी

अहमदनगर/प्रतिनिधी ः आपल्या प्रवचन व कीर्तनाचे व्हीडीओ करून व ते यु ट्युबसह सोशल मिडियातून व्हायरल करून कोट्यवधी कमावणार्‍यांना चाप बसवण्यासाठी आता नग

राज्यात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट
शिर्डीत पतंगोत्सवाची धूम
श्रीरामपुरात वाळू तस्करांकडून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी ः आपल्या प्रवचन व कीर्तनाचे व्हीडीओ करून व ते यु ट्युबसह सोशल मिडियातून व्हायरल करून कोट्यवधी कमावणार्‍यांना चाप बसवण्यासाठी आता नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या कीर्तन व प्रवचनास येताना नागरिकांना मोबाईल आणण्यास बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कीर्तनाला येताना लोकांनी मोबाईल आणू नये, असा नियम करून तो कीर्तनापूर्वीच संयोजकांमार्फत लोकांना कळविण्याचे ठरविण्यात आले आहे.
समाजप्रबोधकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज यांनी युट्यूबर्सवर टीका केल्यानंतरही त्यांच्या कीर्तनात मोबाईलवर व्हिडिओ काढण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे त्यांनी कीर्तन सुरू असताना व्हिडिओ करणार्‍यांना खडसावलेही. मात्र, तरीही लोक ऐकत नसल्याने आता कीर्तनाला येताना मोबाईल आणण्यास बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जबाबदारी संबंधित संयोजकांवर टाकली जाणार असल्याची माहिती मिळाली. अकोले तालुक्यातील कीर्तनात इंदुरीकर यांनी युट्यूबर्सवर टीका केली होती. यू ट्युबवरील व्हिडिओमुळेच आपण अनेकदा अडचणीत आलो आहोत. त्यामुळे ‘आपल्या कीर्तनाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणार्‍यांची मुले दिव्यांग जन्माला येतील,’ असे शापवाणी सदृश्य वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यानंतर इंदुरीकरांचे बीड जिल्ह्यात कार्यक्रम होते. मात्र, तेथेही लोक कीर्तनाचे व्हिडिओ करीत असल्याने इंदुरीकर त्यांना व्हिडिओ न करण्यास सांगत होते. अनेकदा त्यांनी कडक शब्दांत सुनावले. तरीही दोन दिवस विविध ठिकाणी हे प्रकार सुरू होते. लोक ऐकत नसल्याने अखेर त्यांनी संतापून आता कीर्तनात मोबाईल आणण्यास बंदी करण्याचा निर्णय घेतला व तो कीर्तनापूर्वीच संयोजकांमार्फत लोकांना कळविण्याचे ठरविण्यात आले आहे.

तक्रार निघाली निकाली
इंदोरीकर महाराज यांनी आपल्या परवानगीशिवाय ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याबद्दल एका कंपनीविरोधात दिलेल्या तक्रार अर्जाचा निपटारा पोलिसांनी केला असून, यामध्ये संबंधित कंपनीची कोणतीही चूक नाही, असे तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांद्वारे दिली गेली. कीर्तनामध्ये काही छेडछाड करून चुकीचे प्रसिद्ध होण्याची शक्यता असून या माध्यमातून माझी बदनामी होण्याचा संभव आहे, अशी भीती असल्याने संंबंधितांवर कारवाईची मागणी इंदुरीकर महाराजांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, इंदोरीकर महाराज यांनी दिलेल्या अर्जाबाबत माहिती घेऊन संबंधित कंपनीकडे तपासणी केली असता संबंधित कंपनीने त्यांच्याकडील कागदपत्रांनुसार रितसर परवानगी घेतलेली असल्याने कंपनीची कोणतीही चूक नाही, असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

COMMENTS