सोनई : घोडेगाव येथे शनिवारी (दि. २५एप्रिल) दुपारी भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे शनिवारी दुपारच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अहिल्यानगर ते संभाजीनगर या मुख्य राजमार्गांवर रस्त्यावर एकाच वेळी ट्रक, चारचाकी वाहने, दुचाकी तसेच मालवाहतूक वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेषतः मार्केट कमिटी समोर बाजारपेठ परिसर आणि मुख्य चौकाजवळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही वेळ वाहनचालकांना अर्धा ते एक तास रस्त्यातच थांबावे लागले. यामुळे शालेय विद्यार्थी, कामगार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वाहतूक पोलिसांची अपुरी व्यवस्था, रस्त्यावरील अतिक्रमण आणि अवजड वाहनांची वाढती संख्या ही कोंडीची प्रमुख कारणे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. संबंधित सोनई पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी घोडेगाव, सोनई व परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. आम्ही सुमारे एक तास घोडेगाव येथे शनिवारी दुपारी भर उन्हात वाहतूक कोंडीत सापडलो. येथे वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यात पूर्ण पणे निकामी ठरले. प्रवासी वाहने कोठेही वाहने घालून मार्ग काढत असल्याने वाहतूक तासभर ठप्प झाली. यामुळे येथे कार्यक्षम वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. -रवी औताडे, प्रवासी, सलबतपूर

सोनई : घोडेगाव येथे शनिवारी (दि. २५एप्रिल) दुपारी भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे शनिवारी दुपारच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अहिल्यानगर ते संभाजीनगर या मुख्य राजमार्गांवर रस्त्यावर एकाच वेळी ट्रक, चारचाकी वाहने, दुचाकी तसेच मालवाहतूक वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
विशेषतः मार्केट कमिटी समोर बाजारपेठ परिसर आणि मुख्य चौकाजवळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही वेळ वाहनचालकांना अर्धा ते एक तास रस्त्यातच थांबावे लागले. यामुळे शालेय विद्यार्थी, कामगार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
वाहतूक पोलिसांची अपुरी व्यवस्था, रस्त्यावरील अतिक्रमण आणि अवजड वाहनांची वाढती संख्या ही कोंडीची प्रमुख कारणे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. संबंधित सोनई पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी घोडेगाव, सोनई व परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आम्ही सुमारे एक तास घोडेगाव येथे शनिवारी दुपारी भर उन्हात वाहतूक कोंडीत सापडलो. येथे वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यात पूर्ण पणे निकामी ठरले. प्रवासी वाहने कोठेही वाहने घालून मार्ग काढत असल्याने वाहतूक तासभर ठप्प झाली. यामुळे येथे कार्यक्षम वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी.
-रवी औताडे, प्रवासी, सलबतपूर

COMMENTS