Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कचरा समस्येवर कर्जतकरांचा संताप; सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

कर्जत : कर्जत शहरात वाढत चाललेल्या कचरा समस्येविरोधात सर्व सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने अस्वच्छता आणि पर्यावरण प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. चर्चा करताना जिल्हाधिकारी यांच्याकडे नगरपंचायतचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सामाजिक संघटनांच्या वतीने गेल्या २००० हून अधिक दिवस सातत्याने श्रमदानातून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या परिस्थितीमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित कचरा संकलन व्यवस्था सक्षम करावी आणि व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हेच निवेदन कर्जत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. कर्जत शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, तसेच नागरिकांनीही जबाबदारीने सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

साळवण देवीच्या प्रवेशद्वारावरच चिकनची दुकाने; दुकाने हटवण्याची मागणी; नागरिक संतप्त; श्रीगोंदा नगरपरिषदेत ठिय्या 
आष्टी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल कायम, काम 8 वर्षांपासून रखडले
हिंगोलीगेट फुल मार्केटमध्ये दुर्गंधीयुक्त कचर्‍याचे साम्राज्य; फुलविक्रेत्यांचा महापालिकेविरोधात संताप

कर्जत : कर्जत शहरात वाढत चाललेल्या कचरा समस्येविरोधात सर्व सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने अस्वच्छता आणि पर्यावरण प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. चर्चा करताना जिल्हाधिकारी यांच्याकडे नगरपंचायतचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सामाजिक संघटनांच्या वतीने गेल्या २००० हून अधिक दिवस सातत्याने श्रमदानातून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या परिस्थितीमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित कचरा संकलन व्यवस्था सक्षम करावी आणि व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, हेच निवेदन कर्जत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे.

कर्जत शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, तसेच नागरिकांनीही जबाबदारीने सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS