Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

मुंबई ः मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना मंगळवारी राज्य सकरारचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे
भीषण अपघात ! वारकऱ्यांची ट्रक झाली पलटी
सीएसआर फंडातून भोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस 14 लाख रूपये मंजूर

मुंबई ः मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना मंगळवारी राज्य सकरारचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नुकतीच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत अकाऊंटवरून याची घोषणा करण्यात आली आहे.
या पुरस्काराची घोषणा करताना लिहिण्यात आले की, ‘ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.  पुढे या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच अशोक सराफ यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही खूप नाव कमावले आहे. यादरम्यान अशोक सराफ यांनी अनेक मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. अशोक सराफ यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट आणि दिग्गज अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्यामुळेच अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीचे ‘अभिनय सम्राट’ म्हटले जाते. मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणार्‍या अशोक सराफ यांनी तब्बल 250 हून अधिक चित्रपट केले आहेत. अशोक सराफ यांनी आपल्या विनोदी भूमिकांच्या बळावर छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत लोकांना खूप हसवले आहे. मूळचे बेळगावचे असणार्‍या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेलं. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका आहे.

COMMENTS