मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न

फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन केले आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता

मुंबई प्रतिनिधी:- मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठी क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वय रमेश केरे यांनी रविवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्

बेकायदा गाळ्याविरोधात ग्रामस्थाचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
कॉलेजच्या दुसऱ्या माळ्यावरून विद्यार्थिनीने मारली उडी
घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमी युगुलांचे धक्कादायक कृत्य

मुंबई प्रतिनिधी:- मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठी क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वय रमेश केरे यांनी रविवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन केले आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
पैसे घेतल्याचा आरोप होणारी एक ऑडियो क्लीपही व्हायरल होत आहे. केरे यांनी माझ्यावरील आरोप खोटे असून, या ऑडिओ क्लीपची चौकशी करावी, अशी मागणी करत त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रमेश केरे पाटील हे मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये दोन व्यक्ती बोलत असल्याचे दिसतेय. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी केरे यांनी पैसे घेतले, असा आरोप या ऑडिओ क्लीमध्ये करण्यात आला होता. ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर माझा याच्याशी संबंध नसल्याचे केरे यांनी सांगितले होते. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून ही ऑडिओ क्लीप व्हायरल होत असल्यामुळे माझी बदनामी होत असल्याचे म्हणत रमेश केरे यांनी विष प्राशन केले. मुंबईत असताना त्यांनी विष प्राशन केले असून त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS