Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये ‘भक्तीपंढरी’ अवतरणार; संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळा

नेकनूर: बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नेकनूर येथे वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हर

श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीगोंद्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
लोणी बुद्रुक येथे सोमवार पासून हरिनाम सप्ताह

नेकनूर: बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नेकनूर येथे वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 एप्रिल 2026 ते 2 मे 2026 या कालावधीत आठ दिवस ‘भक्तीपंढरी’चा अद्भुत सोहळा अनुभवायला मिळणार आहे.
या सप्ताहात सुप्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या मधुर वाणीतील श्रीराम कथा भाविकांना श्रवण करता येणार असून, राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने, अखंड हरिनाम, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तसेच 24 तास अखंड अन्नदान व ज्ञानदानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता बंकटस्वामी शिक्षक कॉलनी येथून निघणार्‍या भव्य पालखी शोभायात्रेने होईल. त्यानंतर संत महंतांच्या हस्ते ग्रंथपूजन, टाळ-मृदंग पूजन व वीणा पूजन करून सप्ताहाला प्रारंभ होईल. पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 12 ते 2 महाप्रसाद, 2 ते 5 भागवत कथा, 5 ते 6 हरीपाठ, रात्री 8.30 ते 10.30 हरिकिर्तन व त्यानंतर संगीत भजन व हरीजागर असे कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहात दररोज विविध कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली असून, रामेश्वर महाराज शास्त्री, बाळू महाराज गिरगावकर, महादेव महाराज चाकरवाडीकर, विशाल महाराज खोले, अमृताश्रम स्वामी महाराज, उमेश महाराज दशरथे, अच्युत महाराज दस्तापुरकर आदींचा सहभाग असणार आहे. समारोप दिनी ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होईल. या सप्ताहात बंकटस्वामी संस्थानच्या वतीने गरजू मुलींचे सामूहिक विवाह (कन्यादान) आयोजित करण्यात येणार आहेत. विवाहाचा संपूर्ण खर्च उचलून संसारोपयोगी साहित्यही देण्यात येणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे. तसेच रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, सर्व रोगनिदान शिबिर, वृक्षारोपण व शेतकरी मार्गदर्शन यांसारखे विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

COMMENTS