Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

RRB भरती परीक्षेत मराठीचा समावेश; अमित ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वे ताळ्यावर

https://www.youtube.com/watch?v=sQlrFqhEL50 मराठी भाषेची अवहेलना करणाऱ्यांना मनसेने पुन्हा एकदा चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत! केंद्र सरका

डोकी ठिकाणावर ठेवून संवाद साधा !
पीएनजी जोडणी घ्या, अन्यथा एलपीजी सिलेंडर होणार बंदमंत्री भुजबळ यांचा इशारा; पाइप गॅसवर भर देण्याचे आवाहन
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन

मराठी भाषेची अवहेलना करणाऱ्यांना मनसेने पुन्हा एकदा चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत! केंद्र सरकारच्या अख्त्यारीत असणाऱ्या रेल्वे विभागाने मराठीला डावलण्याचा जो डाव आखला होता, तो मनसे नेते अमित ठाकरे यांनी उधळून लावला आहे.
झालं असं की, मध्य रेल्वेने १६ मार्च २०२६ रोजी पदभरतीसाठी एक अधिसूचना काढली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रात परीक्षा असूनही त्यात केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय देण्यात आला होता. मराठी भाषेला या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक हद्दपार करण्यात आले होते.
या अन्यायाविरुद्ध मनसे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “मराठी भाषा आणि भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही, रेल्वेने तात्काळ मराठीचा समावेश करावा, अन्यथा मनसे स्टाईलने जाब विचारला जाईल,” असा सज्जड इशारा अमित ठाकरेंनी दिला होता.

COMMENTS