Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीनाचे आवर्तन सोडण्याचे आ. राम शिंदे यांचे आदेश

कर्जत ः सीना परिसरात सरासरीपेक्षा कमी पर्जन्य झाल्याने भूजल पातळी खालवली आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांच्या सर्

डॉ. भास्कर मोरेला अटक करण्याची पोलिसांनी कृती करावी
जामखेड नगरपरिषदेच्या मलनिःस्सारण प्रकल्पास 77 कोटी मंजूर
जामखेडमधील अतिक्रमण, महामार्ग प्रश्नावर प्रशासन अलर्टसभापती राम शिंदे यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक

कर्जत ः सीना परिसरात सरासरीपेक्षा कमी पर्जन्य झाल्याने भूजल पातळी खालवली आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांच्या सर्व आशा आकांक्षा या आता रब्बी पिकावर अवलंबून आहेत. पिके ऐन भरात आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी आवर्तन सोडण्याची मागणी आ. राम शिंदे यांच्याकडे केली. त्याची तात्काळ दखल घेऊन व वस्तुस्थितीची योग्य माहिती देऊन त्वरीत सीना धरणाचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आ. शिंदे यांनी दिले. त्यानुसार सीना उजवा कालवा आवर्तन दि. 18 नोव्हेंबर रोजी सोडण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या आवर्तनामुळे सीना पट्टयातील पिकांना जीवदान मिळणार आहे. योग्य वेळेस आवर्तन सुटणार असल्यामुळे शेतकरी सुखावणार आहेत. शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेऊन तात्काळ निर्णय करून आवर्तन सोडण्याचे आ. शिंदे यांनी आदेश दिल्यामुळे सीना परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी म्हटले आहे.

COMMENTS